गुहागरात शिवसैनिकांनी जाळला नारायण राणे यांचा पुतळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:36 IST2021-08-25T04:36:30+5:302021-08-25T04:36:30+5:30

गुहागर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना वादग्रस्त विधान केल्याने शिवसेनेकडून संताप व्यक्त ...

Shiv Sainiks burn statue of Narayan Rane in Guhagar | गुहागरात शिवसैनिकांनी जाळला नारायण राणे यांचा पुतळा

गुहागरात शिवसैनिकांनी जाळला नारायण राणे यांचा पुतळा

गुहागर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना वादग्रस्त विधान केल्याने शिवसेनेकडून संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर गुहागर तालुका शिवसेनेतर्फे गुहागर बाजारपेठेत नारायण राणे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.

गुहागर तालुका शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बाजारपेठेमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचा कडाडून निषेध करत घोषणाबाजी केली. तसेच राणे यांच्या पुतळा जाळून ‘मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे अंगार है बाकी सब भंगार है’ अशा घोषणा दिल्या. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख सचिन जाधव, महिला आघाडी प्रमुख पारिजात कांबळे, उपतालुकाप्रमुख उमेश खैर, गुहागर शहरप्रमुख नीलेश मोरे, अमरदीप परचुरे, राकेश साखरकर, प्रदीप सुर्वे, दीपक कनगुटकर, प्रभुनाथ देवळेकर, राज विखारे, विनायक जाधव, सारिका करंगुटकर, प्रभाकर दगडे, वैभव गुहागरकर, शैलेश भोसले, राजू हरचिलकर उपस्थित होते.

Web Title: Shiv Sainiks burn statue of Narayan Rane in Guhagar