शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

प्रशिक्षणासाठी शाळा बंद ?

By admin | Updated: October 1, 2014 01:07 IST

निमित्त निवडणुकीचे : एकाच शाळेतील जास्तीत जास्त शिक्षकांची नियुक्ती

सागर पाटील / टेंभ्येनिवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांबाबतच्या चुकीच्या नियोजनामुळे प्रशिक्षण काळात शाळा बंद ठेवण्याची वेळ मुख्याध्यापकांवर आली आहे. काही ठराविक शाळांमधीलच जास्तीत जास्त शिक्षक निवडणूक कामासाठी नियुक्त केल्यामुळे प्रशिक्षण व निवडणूक काळातील शाळांच्या कामकाजाच्या दिवशी अध्यापन कोणी करायचे, हा प्रश्न शाळासमोर निर्माण झाला आहे.अनेक शाळांमधून मुख्याध्यापक व एक-दोन शिक्षक सोडून सर्वच शिक्षक निवडणूक कामासाठी नियुक्त केल्याने अशा शाळांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे काही शाळांमधील एकाही शिक्षकाची निवडणूक कामासाठी नियुक्ती करण्यात आलेली नाही.सध्या राज्यात सुरु असलेल्या विधानसभा निवडणूक कामासाठी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची मोठ्या प्रमाणात नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमध्ये विसंगती असल्याने अनेक शाळांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यामध्ये निवडणुकीसाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना जिल्ह्यातील सर्व शाळांमधून सम प्रमाणात शिक्षक नियुक्त करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात अनेक शाळांमधून २८ शिक्षकांपैकी २५, १५ शिक्षकांपैकी १२ अशा प्रमाणात शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विरोधाभासात्मक बाब म्हणजे काही शाळांमधून एकाही शिक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. या प्रकारामुळे प्रशिक्षण काळात व प्रत्यक्षात निवडणूक काळात शालेय कामकाजादिवशी अध्यापन कोणी करायचे? हा प्रश्न संबंधित शाळेतील मुख्याध्यापकांसमोर निर्माण झाला आहे. शिक्षक नसल्याने शाळा बंद ठेवण्याची वेळ या शाळांवर आली आहे. जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाने सर्व शाळांमधील शिक्षकांची समप्रमाणात नियुक्ती करावी, यामुळे अध्यापन कार्यात अडथळा येणार नाही. अशी मागणी निवडणूक प्रशासनाकडे केली होती. प्रत्यक्षात मात्र निवडणूक प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचे मित्र पाहायला मिळत आहे. विशेष बाब म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान केलेल्या शिक्षक नियुक्तीच्या नियोजनान प्रशासनाने कोणताही बदल केला नसल्याचे मत शिक्षकांमधून व्यक्त केले जात आहे. सर्व शाळांमधील समप्रमाण शिक्षक नियुक्त करण्यात आले असते, तर विद्यार्थ्यांचे ऐन परीक्षेच्या काळात होणारे नुकसान टाळता आले असते, असे मत शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे. निवडणूक प्रशिक्षण दोन टप्प्यामध्ये घेण्यात येणार आहे. यामध्ये पहिला टप्पा दि. २८ ते २९ सप्टेंबर रोजी घेण्यात आला. दुसरा टप्पा दि. ४ ते ५ आॅक्टोबर या दरम्यान होणार आहे. प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेसाठी दि. १४ ते १६ आॅक्टोबर हे दिवस लागणार आहेत. याच कालावधीत प्रथम सत्र परीक्षा सुरु होत आहेत. दि. ७ ते १८ आॅक्टोबर दरम्यान परीक्षा होणार आहेत. यामुळे दि. १४ ते १६ आॅक्टोबर रोजी परीक्षा संयोजनामध्ये अडथळा निर्माण होणार आहे.