रेश्मा झगडे यांची आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:31 IST2021-05-12T04:31:41+5:302021-05-12T04:31:41+5:30

आबलोली : गुहागर तालुक्यातील आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्रास जिल्हा परिषद, रत्नागिरीच्या कृषी व पशुसंवर्धन, दुग्धविकास सभापती रेश्मा झगडे ...

Reshma Jagde visits Abloli Primary Health Center | रेश्मा झगडे यांची आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट

रेश्मा झगडे यांची आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट

आबलोली : गुहागर तालुक्यातील आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्रास जिल्हा परिषद, रत्नागिरीच्या कृषी व पशुसंवर्धन, दुग्धविकास सभापती रेश्मा झगडे यांनी भेट देऊन पाहणी केली.

कोविड - १९च्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत माहिती घेण्यासाठी व लसीकरणाची माहिती घेण्यासाठी त्यांनी भेट दिली.

यावेळी आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. एच. गावंड यांनी त्यांचे स्वागत केले. आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रात कोरोना रुग्णांची स्थिती, सुरू असलेले लसीकरण, बाह्य रुग्ण सेवा आदींबाबत माहिती दिली. सभापती रेश्मा झगडे यांनी कोरोना लसीकरण कक्ष, बाह्य रुग्ण विभाग यांची प्रत्यक्ष पाहणी केली. सुयोग्य नियोजन, सुरक्षित अंतर, सॅनिटायझर, मास्क याची काळजी घेऊन कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले. यावेळी आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

----------------------

गुहागर तालुक्यातील आबलाेली प्राथमिक आराेग्य केंद्राला जिल्हा परिषदेच्या सभापती रेश्मा झगडे यांनी भेट देऊन पाहणी केली.

Web Title: Reshma Jagde visits Abloli Primary Health Center