शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

Ganeshotsav : गणेशोत्सवासाठी आजपासून जादा गाड्या, भक्त निघाले कोकणला, १२ सप्टेंबरपर्यंत आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 16:24 IST

गौरी-गणपतीच्या सणाला अवघे पाच दिवस शिल्लक राहिले असून, गणेशोत्सवासाठी कोकणात राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे २ हजार २२५ जादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मंगळवार, ८ सप्टेंबरपासून १२ सप्टेंबरपर्यंत या जादा गाड्या येणार असून, सर्वात जास्त १ हजार ५७९ गाड्या मंगळवार, ११ सप्टेंबर रोजी सोडण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देसर्वाधिक गाड्या मंगळवारी : भक्त निघाले कोकणला, १२ सप्टेंबरपर्यंत आगमन

रत्नागिरी : गौरी-गणपतीच्या सणाला अवघे पाच दिवस शिल्लक राहिले असून, गणेशोत्सवासाठीकोकणात राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे २ हजार २२५ जादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मंगळवार, ८ सप्टेंबरपासून १२ सप्टेंबरपर्यंत या जादा गाड्या येणार असून, सर्वात जास्त १ हजार ५७९ गाड्या मंगळवार, ११ सप्टेंबर रोजी सोडण्यात येणार आहेत.गणेशोत्सवाकरिता जादा २ हजार २२५ गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी विभागातर्फे दररोजच्या ८० गाड्या सोडण्यात येणार आहेत. भाविकांच्या परतीच्या प्रवासासाठी १ हजार ५०० जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.

गणेशोत्सवासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळ सज्ज झाले असून, रत्नागिरी विभागातर्फे ठिकठिकाणी प्रवासी स्वागताचे शुभेच्छा फलक लावण्यात आले आहेत. कोकण रेल्वे, खासगी गाड्यांमधून प्रवासी मोठ्या संख्येने येत असले तरी दरवर्षी एस. टी. महामंडळातर्फे प्रवाशांच्या सोयीसाठी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात येते.

गेल्यावर्षी २ हजार २१६ जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात २ हजार ७२ गाड्या कोकणात आल्या. यावर्षी गणेश चतुर्थी १३ सप्टेंबरला असल्यामुळे ८ पासून जादा गाड्या मुंबई, ठाणे, पालघर येथून दाखल होणार आहेत. दिनांक ८ सप्टेंबर रोजी १३, ९ रोजी ७५, १० रोजी ३५५, ११ रोजी १ हजार ५७९ आणि१२ला २०४ जादा गाड्या कोकणात येणार आहेत.ग्रुप बुकिंगला सर्वाधिक प्रतिसादमुंबईतून ग्रुप बुकिंगच्या ८९०, आरक्षणाच्या २३५ मिळून एकूण १ हजार १२५ गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ठाणेतून ग्रुप बुकिंगच्या ५२७, तर आरक्षणाच्या ३५१ मिळून ८७८, पालघर येथून ग्रुपच्या १६६ व आरक्षणाच्या ५६ मिळून २२२ गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

एकूण गु्रप बुकिंगच्या १ हजार ५८३ व आरक्षणाच्या ६४२ जादा गाड्यांचे नियोजन महामंडळाने केले आहे. मुंबईतून ४००, पुण्यातून ४२५, औरंगाबादमधून ४५० व नाशिकातून ४७५ बसेस मिळून एकूण १ हजार ७५० जादा बसेस घेण्यात येणार आहेत.गणेशोत्सव कालावधीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी रत्नागिरी विभागातर्फे जादा गाड्यांसमवेत तपासणी नाके, गस्तीपथके तैनात करण्यात येणार आहेत. ही गस्तीपथके कशेडी ते संगमेश्वर व संगमेश्वर ते राजापूरपर्यंत कार्यरत राहणार आहेत. चिपळूण - शिवाजीनगर व संगमेश्वर बसस्थानक येथे तपासणी केंद्र उभारले जाणार आहे. संगमेश्वर येथे दुरूस्ती केंद्र, तर चिपळूण - शिवाजीनगर येथे क्रेन उपलब्ध करून दिली जाणार आहे.

गणेशोत्सव कालावधीत कोकण रेल्वेतून येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणाऱ्या सर्व गाड्या रेल्वे स्थानकमार्गे वळविण्यात येणार आहेत. चिपळूण, खेड, संगमेश्वर रेल्वेस्थानकांसाठी स्पेशल गाड्या सोडण्यात येणार आहेत. तसेच आवश्यकता भासल्यास रत्नागिरीतील शहरी मार्गावरील गाड्यांच्या संख्येतही वाढ केली जाणार आहे. रत्नागिरी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत.- अनिल मेहतर,विभाग नियंत्रक, रत्नागिरी विभाग

गस्तीपथके तैनातठाणे विभागाचे दुरूस्तीपथक इंदापूर येथे, रायगडचे पथक कशेडी येथे, तर रत्नागिरीचे पथक संगमेश्वर व सिंधुदुर्गचे पथक तरळा येथे दिनांक ८ रोजीपासून कार्यरत राहणार आहे. याशिवाय पेण, नागोठणे, माणगाव, महाड, खेड, चिपळूण, लांजा, राजापूर, कणकवली या एस. टी. कार्यशाळा आजपासून २४ तास कार्यरत राहणार आहेत. रायगड व रत्नागिरी विभागाची गस्तीपथके महामार्गावर ८ ते १३ सप्टेंबरपर्यंत २४ तास कार्यरत राहणार आहेत.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवstate transportराज्य परीवहन महामंडळRatnagiriरत्नागिरीkonkanकोकण