शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 19:58 IST

Nagpur : खुर्चीच्या नादात पद गेलं; रोजगार मेळाव्यातील वादामुळे पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

नागपूर : काही दिवसांपूर्वी टपाल विभागाने रोजगार मेळा आयोजित केला होता, कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते पण कार्यक्रमादरम्यान निर्माण झालेल्या वादामुळे निलंबनाच्या मार्गावर पोहचलेली पीएमजी शोभा मधाळे यांचे प्रकरण नागपूरमध्ये चर्चेचा विषय झाली आहे. विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, रोजगार मेळाव्याच्या आयोजनामध्ये त्यांच्याकडून चुकीचे वर्तन आढळल्याने दिल्ली येथील मुख्यालयाने कठोर कारवाई केली आहे. 

२४ ऑक्टोबर रोजी शहरातील राजनगरमधील नॅशनल फायर सर्व्हिसेस कॉलेजमध्ये जाहीर रोजगार मेळावा झाला होता, ज्याचे आयोजन टपाल विभागाने केले होते. या कार्यक्रमाचा नोडल अधिकारी कार्यालयीन आदेशानुसार प्रभारी पोस्टमास्टर जनरल सुचिता जोशी यांच्याकडे वाटला होता. मात्र कार्यक्रमादरम्यान बदलीचे ऑर्डर मिळालेले असूनही शोभा मधाळे यांनी त्या ऑर्डरांना विरोध करून उपस्थिती दर्शवली. 

कार्यक्रमादरम्यान मंचावर उपस्थित असताना मधाळे आणि जोशी यांच्यात वाद उत्पन्न झाला. या दरम्यान मधाळे यांनी जोशी यांना हाताच्या कोपऱ्याने धक्का दिला व चिमटा काढल्याचा प्रकार समोर आला. हे सगळे नवीन उमेदवार व अन्य अधिकारी उपस्थित असताना घडले, व त्याचा व्हिडिओही अधिकार्‍यांपर्यंत पोहोचला त्यानंतर भेदभाव व वर्तनविरुद्धच्या या घडामोडी लक्षात घेता दिल्ली येथील टपाल विभागाने गुरुवार, ६ नोव्हेंबर रोजी शोभा मधाळे यांना अनिश्चित काळासाठी निलंबित केले आहे. त्यांचे कार्यालयीन कामकाज थांबविण्यात आले असून, त्यांचे बदलीचे आदेश आधीच आले होते. सुचिता जोशी यांना तात्पुरता प्रभार देण्यात आला आहे. 

या घटनेमुळे विभागातील अनुशासन प्रश्न पुन्हा चर्चेत आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, सार्वजनिक सेवेत कार्यरत वरिष्ठ अधिकारी आणि त्यांचे वर्तन, तेव्हा जबाबदारीशी जुळणारे वर्तन महत्त्वाचे ठरते. या वादग्रस्त परिस्थितीनंतर विभागाने पुढील तपास सुरू केला असून, कोणत्या प्रकारची कार्यवाही होईल हे लवकरच समोर येईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Chair Fight: PMG Shobha Madhale Suspended Indefinitely After Viral Video

Web Summary : PMG Shobha Madhale suspended indefinitely after a dispute with Suchita Joshi at a postal event in Nagpur. A video of the altercation went viral, leading to disciplinary action by the postal department headquarters in Delhi.
टॅग्स :nagpurनागपूरsuspensionनिलंबनPost Officeपोस्ट ऑफिसNitin Gadkariनितीन गडकरी