शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
5
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
6
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
7
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
8
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
9
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
10
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
11
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
12
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
13
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
14
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
15
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
16
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
17
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
18
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
19
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
20
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 18:14 IST

बिहारमध्ये काल विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान झाले. दरम्यान, आता समस्तीपूरमधील सराईरंजन येथील केएसआर कॉलेजजवळ रस्त्यावर व्हीव्हीपॅट स्लिप्स पडल्याचे दिसत आहे.

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. निवडणुका जाहीर झाल्याच्या पहिल्या दिवसापासून निवडणूक आयोगावर आरोप सुरू आहेत. दरम्यान, आता बिहारमधून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. समस्तीपूर जिल्ह्यातील सरायरंजन विधानसभा मतदारसंघातील केएसआर कॉलेजजवळ रस्त्याच्या कडेला ईव्हीएममधील मोठ्या प्रमाणात व्हीव्हीपॅट स्लिप्स पडल्याचे समोर आले. राष्ट्रीय जनता दलाने निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर आणि निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 

अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल

आरजेडीने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट केली. "समस्तीपूरच्या सरायरंजन विधानसभा मतदारसंघातील केएसआर कॉलेजजवळ रस्त्यावर ईव्हीएममधील मोठ्या प्रमाणात व्हीव्हीपॅट स्लिप्स फेकल्या. या स्लिप्स कधी, कसे, का आणि कोणाच्या इशाऱ्यावर फेकल्या गेल्या? चोर आयोग याचे उत्तर देईल का? हे सर्व बाहेरून येऊन बिहारमध्ये तळ ठोकून बसलेल्या लोकशाहीच्या लुटारूच्या इशाऱ्यावर घडत आहे का?, असा सवाल या पोस्टमध्ये केला आहे.

निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी या प्रकरणात तातडीने कारवाई केली आहे आणि संबंधित सहाय्यक निवडणूक अधिकारी (ARO) यांना निष्काळजीपणाबद्दल निलंबित केले. त्यांनी त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेशही दिले आहेत. समस्तीपूरचे जिल्हा निवडणूक अधिकारी यांना या घटनेची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  मॉक पोल दरम्यान या व्हीव्हीपीएटी स्लिप्स वापरण्यात आल्या होत्या आणि त्यांची विल्हेवाट लावण्यात एआरओच्या निष्काळजीपणामुळे प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेच्या अखंडतेवर कोणताही परिणाम झाला नाही. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सर्व उमेदवारांना कळवले आहे, असे निवडणूक आयोगाने एक अधिकृत निवेदन जारी करून स्पष्ट केले .

बिहार विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान ६ नोव्हेंबर रोजी झाले. सराईरंजन विधानसभा मतदारसंघातही पहिल्या टप्प्यात मतदान झाले. प्रत्यक्ष मतदानापूर्वी प्रत्येक मतदान केंद्रावर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचे योग्य कार्यप्रदर्शन पडताळण्यासाठी आणि निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी मॉक पोल घेतले जातात. मतदानानंतर दोन दिवसांनी शीतलपट्टी गावात कचऱ्यात व्हीव्हीपॅट स्लिप्स आढळल्या. महाआघाडीतील पक्ष याबाबत निवडणूक आयोगाला प्रश्न विचारत आहेत. वाद वाढत असल्याचे पाहून समस्तीपूरचे जिल्हा दंडाधिकारी रोशन कुशवाह आणि पोलिस अधीक्षक अरविंद प्रताप सिंह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी विरोधी पक्षांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले.

English
हिंदी सारांश
Web Title : VVPAT Slips Found on Bihar Road; ARO Suspended, FIR Ordered

Web Summary : VVPAT slips were discovered near a polling station in Bihar, raising questions about election integrity. The Election Commission suspended the ARO and ordered an investigation after RJD raised concerns. The slips were from mock polls and had no impact on voting, the EC clarified.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५BiharबिहारElectionनिवडणूक 2024Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग