शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 18:00 IST

या घटनेत मानसिक ताण, आर्थिक अडचणी, कौटुंबिक कलह व सामाजिक दबाव यांचा समावेश असू शकतो का याचा पोलीस शोध घेत आहेत.

गांधीनगर - गुजरातमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी गांधीनगर येथे ३ पेट्रोल पंपाच्या मालकाचा आणि त्यांच्या २ मुलींचा मृत्यू झाला आहे. नर्मदा कॅनलमधून मालकासह २ मुलींचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. पेट्रोल पंपाचे मालक एक दिवस आधी २ मुलींचे आधार कार्ड बनवण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर जेव्हा ते घरी परतले नाहीत तेव्हा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. त्यानंतर या तिघांचा शोध सुरू झाला. ही हत्या आहे की आत्महत्या याबाबत पोलीस सर्व अँगलने तपास करत आहेत. 

कॅनलमध्ये सापडले ३ मृतदेह

पोलिसांच्या माहितीनुसार, गांधीनगर येथील धीरजभाई रबारी असं मृत व्यक्तीचे नाव आहे. धीरजभाई कथितपणे गुरुवारी सकाळी त्यांच्या २ मुलींना घेऊन घरातून बाहेर पडले होते. मुलींचे आधार कार्ड बनवायचे आहे असं त्यांनी घरच्यांना सांगितले. रात्री उशीरा ते घरी परतले नाहीत त्यामुळे कुटुंब चिंतेत सापडले. या तिघांचा शोध सुरू झाला. त्यानंतर नर्मदा कॅनलमध्ये ३ मृतदेह  सापडले. आता पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

धीरजभाई हे तीन पेट्रोल पंपांचे मालक आहेत, ते आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूने अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या घटनेत मानसिक ताण, आर्थिक अडचणी, कौटुंबिक कलह व सामाजिक दबाव यांचा समावेश असू शकतो का याचा पोलीस शोध घेत आहेत. मृतदेहाचा पोस्टमॉर्टम अहवाल आणि फोरेंसिक तपास यावरून ही घटना अपघात, आत्महत्या किंवा हत्या यापैकी काय आहे हे कारण स्पष्ट होईल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Petrol pump owner, two daughters found dead; Suspicious circumstances

Web Summary : Gujarat petrol pump owner and his two daughters found dead in Narmada canal. They left home to get Aadhaar cards made. Police investigate possible suicide, murder, or accident. Financial strain, family issues probed.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस