शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं

By संतोष कनमुसे | Updated: November 8, 2025 20:12 IST

'या व्यवहाराची मला काहीही माहिती नव्हती. ज्यांनी रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जाऊन सह्या केल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. विरोधकांना निवडणुकीच्या काळात अशा कोणत्या बातम्या मिळाली की त्यामध्ये खत पाणी घालणे हे त्यांचे काम आहे, असंही अजित पवार म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने केलेल्या जमीन व्यवहाराची जोरदार चर्चा सुरू आहे. काल पवार यांनी हा व्यवहार रद्द झाल्याची माहिती दिली.  दरम्यान, आज उपमुख्यमंत्री पवार पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी या प्रकरणाची माहिती दिली असून या व्यवहारात पैशाची देवाण-घेवाण झालीच नसल्याची माहिती दिली. यामुळे समोरच्या पार्टीने ह सगळे कसे काय केले याची चौकशी करण्यात येणार आहे, तसेच यामध्ये कोणी कोणाची फसवणूक केली हे समोर येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. 

नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 

'या व्यवहाराची मला काहीही माहिती नव्हती. ज्यांनी रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जाऊन सह्या केल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरोधकांना निवडणुकीच्या काळात अशा कोणत्या बातमी मिळाली की त्यामध्ये खत पाणी घालणे हे त्यांचे काम असते, असा टोलाही पवार यांनी विरोधकांना लगावला. "एकदा चौकशी होऊ द्या. एकनाथ शिंदे यांनीही तेच सांगितले आहे. या प्रकरणाची समिती बारकाईने चौकशी करेल. जमिनीचा व्यवहार झाला होता पण त्यांना अजून पझेशन मिळाले नव्हते. सरकारी जमिनीचे व्यवहार होताच कामा नये, सरकारी अधिकाऱ्यांनी ते थांबवायला पाहिजे होते, असे अजित पवार म्हणाले.

"पुन्हा अशा पद्धतीच्या जमिनींचे व्यवहार होऊ नये म्हणून खबरदारी घेतली पाहिजे. या प्रकरणी विकास खरगे यांची टीम तपास करेल. आपल्या राज्याचा टॅक्स बुडता कामा नये, असंही अजित पवार म्हणाले. मी प्रशासनाला कालच एक सल्ला दिला. माझ्या जवळचे, लांबचे नातेवाईक अशा पद्धतीने व्यवहार किंवा कामे करत असतील तर कोणाच्याही दबावाल घाबरू नका. नियमावर बोट ठेवूनच काम करा, असे मी सांगितले आहे. माझे कालपर्यंत उशीरापर्यंत काम सुरू होते, मी आज पुण्याला आलो. पार्थ मुंबईत आहे. मी त्याला भेटून सांगणार आहे, असेही अजित पवार म्हणाले. 

"या व्यवहारात एक रुपयाही दिलेला नाही"

यावेळी पत्रकारांनी एवढी मोठी गुंतवणूक करत असताना तुम्हाला त्याची माहिती दिली होती का? असा प्रश्न केला. यावेळी अजित पवार म्हणाले, या प्रकरणात एक रुपयाचीही गुतंवणूक केलेली नाही,  मी या प्रकरणातील सगळे काही बघितले. एक रुपया न घेताही समोरच्या पार्टीने कसे काय एवढे केले. आता यामध्ये कोण फसले आहे याची चौकशी केली जाणार आहे, या सर्व प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर मी पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : No money exchanged, inquiry into land deal: Ajit Pawar clarifies.

Web Summary : Ajit Pawar clarified that no money was exchanged in his son's land deal. An inquiry will investigate potential fraud and procedural lapses by officials. He emphasized transparency and warned relatives against exploiting his position.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारparth pawarपार्थ पवार