शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 18:53 IST

Acid Attack On Sister-in-Law: विधवा भावजयीने लग्नासाठी नकार दिला म्हणून तिच्यावर अ‍ॅसिड हल्ला केल्याची घटना उघडकीस आली.

ग्वाल्हेर शहरात शुक्रवारी संध्याकाळी कंपू पोलीस स्टेशन परिसरातील अवदपुरा भागात एक अत्यंत संतापजनक घटना घडली. लग्नाला नकार दिल्यामुळे एका विधवेवर तिच्या जेठाने घरात घुसून अ‍ॅसिड हल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीररित्या भाजली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव मुशीर खान असे आहे. मुशीर खान याच्याही पत्नीचा मृत्यू झाला आहे. धाकट्या भावाच्या मृत्युनंतर मुशीर खान हा त्याच्या विधवा भावजयीच्या प्रेमात पडला. तिच्याशी लग्न करण्यासाठी तो तिच्यावर सतत दबाव आणत होता. पुतण्यांना भेटण्याच्या बहाण्याने मुशीर खान वारंवार पीडितेच्या घरी जायचा. परंतु, पीडितेने मुशीर खानच्या लग्नाच्या मागणीला स्पष्ट नकार दिला. यामुळे तो संतापला आणि त्याने पीडितेला जीवे मारण्याची योजना आखली.

दरम्यान शुक्रवारी संध्याकाळी मुशीर खान अ‍ॅसिडची बाटली घेऊन पीडितेच्या पालकांच्या घरी पोहोचला. हल्ल्याच्या वेळी महिला आपल्या घरात भाजीपाला कापत होती. संतप्त मुशीर खानने घरात घुसून थेट तिच्यावर अ‍ॅसिड फेकले. या हल्ल्यात पीडितेचा चेहरा, छाती, हात आणि पाय गंभीरित्या भाजले. तिला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच कंपू पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी काल रात्री उशिरा मुशीर खानला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Brother-in-law Throws Acid on Widow for Rejecting Marriage Proposal

Web Summary : In Gwalior, a man threw acid on his widowed sister-in-law after she refused to marry him. The woman sustained severe burns and is hospitalized. Police arrested the accused, who was pressuring her for marriage after her husband's death.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशgwalior-pcग्वालियर