शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूणमधील गोंधळे जंगलात आढळला दुर्मीळ शॅमेलियन सरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : तालुक्यातील गोंधळे येथील जंगलात अत्यंत दुर्मीळ असणारा शॅमेलियन सरडा आढळला. याबाबत येथील तरुणांनी तत्काळ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : तालुक्यातील गोंधळे येथील जंगलात अत्यंत दुर्मीळ असणारा शॅमेलियन सरडा आढळला. याबाबत येथील तरुणांनी तत्काळ वर्ल्ड फॉर नेचर संस्थेला कल्पना दिली असता, संस्था सदस्यांनी तत्काळ गोंधळे जंगलात येत रेस्क्यू करून सुरक्षितपणे या सरड्याला नैसर्गिक जंगलात सोडले. गोंधळे येथील जंगलात हा सरडा सापडल्याने वनसंपत्ती आणि वन्यजीव अभ्यासासाठी हे जंगल महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे वर्ल्ड फॉर नेचर सदस्यांचे म्हणणे आहे.

तालुक्यात अनेक मोठी जंगले असून, त्यामध्ये विविध वन्यजीव व प्राणी आढळतात. काही वन्यप्रेमी, निसर्गमित्र याठिकाणी वनसंपत्ती व वन्यजीवांचे संशोधन आणि अभ्यास करण्यासाठी येत असतात. यापूर्वी अनेकवेळा येथे दुर्मीळ जातीचे पक्षी, प्राणी आढळले आहेत. पण आता अत्यंत दुर्मीळ जातीचा व कोकणात न आढळणारा असा सरडा आढळल्याने पुन्हा एकदा चिपळूण तालुक्यातील जंगल संपत्तीची चर्चा सुरू झाली आहे.

गोंधळे गावातील जंगल हे विस्तीर्ण आणि घनदाट आहे. काही तरुण येथे फेरफटका मारत असताना त्यांना एक आगळावेगळा सरडा निदर्शनास आला. हिरवा पोपटी रंग आणि त्याच्यावर सफेद ठिपके असा सुंदर सरडा बघितल्यानंतर हा सरडा दुर्मीळ जातीचा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ वर्ल्ड फॉर नेचर या संस्थेशी संपर्क साधला. या संस्थेचे अमित जाधव, स्वप्नील जाधव, अविनाश जाधव आणि कार्याध्यक्ष प्रथमेश पवार यांनी थेट गोंधळे येथील जंगलात येत य सरड्याची पाहणी केली. हा शॅमेलियन जातीचा अत्यंत दुर्मीळ असा सरडा असल्याचे त्यांच्या अभ्यासातून पुढे आले. वातावरणाप्रमाणे आणि निसर्ग ऋतूप्रमाणे रंग बदलणारा गिरगिट म्हणून त्याची ओळख आहे.

170721\img-20210717-wa0017.jpg

चिपळूणमधील गोंधळे जंगलात आढळला दुर्मिळ शॅमलियन सरडा