शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
3
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
4
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
5
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
7
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
10
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
11
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
12
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
13
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
14
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
15
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
16
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
17
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
18
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
19
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
20
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी काम करणाऱ्यांना दे धक्का

By admin | Updated: October 1, 2015 00:28 IST

एस. टी. महामंडळ : मान्यताप्राप्त कामगार संघटनेचे स्पष्टीकरण

रत्नागिरी : महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेच्या रत्नागिरी आगाराची कार्यकारिणी बरखास्त केली नसून, संघटनाविरोधी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदावरून दूर केले आहे. रत्नागिरी आगाराची कार्यकारिणी मात्र पूर्वीप्रमाणेच ठेवली असल्याचे स्पष्टीकरण महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेच्या रत्नागिरी विभागाने केला आहे.महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष शिवाजीराव चव्हाण रत्नागिरीत आले होते. त्यावेळी रत्नागिरी आगाराची कार्यकारिणी रद्द करुन नवीन कार्यकारिणी नियुक्त केली. मात्र, हा प्रकार हुकूमशाही पद्धतीचा असून, रद्द करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप आगार सचिव सचिन वायंगणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता.सचिन वायंगणकर यांनी केलेल्या आरोपांचे खंडन करताना रत्नागिरी आगाराचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार हे संघटनेच्या कोणत्याही मिटिंगला उपस्थित राहात नव्हते. संघटनेच्या खेड येथील वार्षिक मेळाव्यास तसेच १२ सप्टेंबर रोजी मुंबई येथे आयोजित केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रादेशिक मेळाव्याला आगाराचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार उपस्थित राहिले नाहीत. संघटनेच्या वेळोवेळी होणाऱ्या सभेला आगाराचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार उपस्थित राहात नाहीत. तसेच विभागीय अध्यक्ष, विभागीय सचिवांच्या आदेशाचे पालन करीत नसल्यामुळे व आगारातील संघटनेच्या सभासदांच्या तक्रारी व मागण्यांचे आगाराचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार दुर्लक्ष करीत असल्यामुळे रत्नागिरी आगारातील बहुसंख्य सभासद वारंवार संघटनेच्या विभागीय कार्यकारिणीकडे तक्रार करीत असल्याचे संघटनेच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.आगारातील संघटनेच्या सभासदांच्या मागण्यांकडे व प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे व फक्त आगाराचे अध्यक्ष, सचिव व खजिनदार स्वार्थ बघत असल्यामुळे त्यांना पदावरून दूर करण्याची मागणी २४ सप्टेंबरच्या विभागीय अध्यक्ष विजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विभागीय कार्यकारिणीच्या बैठकीत केली. अध्यक्ष, सचिव, खजिनदार या फक्त तीन पदाधिकाऱ्यांना पदावरून दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, उर्वरित कार्यकारिणी पूर्वीप्रमाणेच कायम आहे. आगाराची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आलेली नाही. फक्त आगाराचे अध्यक्ष, सचिव व खजिनदार हे पदाधिकारी बदलले असल्याचे विभागीय अध्यक्ष विजय जाधव यांनी सभेमध्ये जाहीर केले. रत्नागिरी विभागाच्या सचिवांनी सचिव पदाचा राजीनामा विभागीय अध्यक्षांकडे दिला होता. विभागीय कार्यकारिणीने तो राजीनामा मंजूर केल्याने अ‍ॅडव्हॉक समिती नेमली व त्यात विभागीय सचिवपदी रवींद्र लवेकर व कार्याध्यक्षपदी दत्ताराम घडशी यांची निवड केली. त्याला राज्य संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांनी मंजुरी दिली आहे, असे रत्नागिरी विभागीय अध्यक्ष विजय जाधव यांनी पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)