खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईकांना बारसूत जाण्यासाठी पोलिसांनी रोखले

By मनोज मुळ्ये | Updated: April 26, 2023 12:20 IST2023-04-26T12:20:04+5:302023-04-26T12:20:47+5:30

भू सर्वेक्षण परिसरात जाण्यास मनाई प्रतिबंधात्मक आदेश

Police stopped MP Vinayak Raut MLA Vaibhav Naik from going to Barsut | खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईकांना बारसूत जाण्यासाठी पोलिसांनी रोखले

खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईकांना बारसूत जाण्यासाठी पोलिसांनी रोखले

रत्नागिरी : बारसूमध्ये जाण्याच्या तयारीत असलेले ठाकरे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव यांच्यासह ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या गाड्या बारसूपासून ५ किलोमीटर अंतरावरच पोलिसांनी अडवल्या. बराचवेळ झालेल्या चर्चेनंतर पोलिसांनी खासदार राऊत आणि आमदार नाईक या दोघांच्याच गाड्या सोडण्यात आल्या.

बुधवारी ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी बारसूकडे जाणार असल्याची तयारी करत होते. त्यामुळे रत्नागिरी शहर पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना भू सर्वेक्षण परिसरात जाण्यास मनाई करणारा प्रतिबंधात्मक आदेश बजावला. मात्र तरीही हे पदाधिकारी तसेच खासदार विनायक राऊत आणि मालवणचे आमदार वैभव नाईक बारसूकडे रवाना झाले.

बारसूपासून ५ किलोमीटर अंतरावर धारतळे येथेच पोलिसांनी त्यांच्या गाड्या अडवल्या. लोकप्रतिनिधी म्हणून तेथे जाण्याचा आग्रह या पदाधिकाऱ्यांनी धरला. त्यामुळे खासदार राऊत आणि आमदार नाईक या दोघांच्याच गाड्या पुढे सोडण्यात आल्या.

Web Title: Police stopped MP Vinayak Raut MLA Vaibhav Naik from going to Barsut