शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘पीके’ चित्रपट बंद पाडला

By admin | Updated: December 31, 2014 00:21 IST

चिपळूण : शिवसेना व हिंदू जनजागृती समिती आक्रमक

चिपळूण : ‘पीके’ या चित्रपटातील काही दृश्यांमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत, असा आरोप करून हिंदू जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज मंगळवारी येथील पूजा थिएटरमधील या चित्रपटाचे प्रक्षेपण बंद पाडले. थिएटर व्यवस्थापक अविराज भुवड यांनी हिंदुत्ववाद्यांच्या संतप्त भावनांची दखल घेत ‘पीके’ चित्रपटांचे होर्डिंग उतरविले. यावेळी शिवसेनेचे गटनेते राजेश देवळेकर, नगरसेवक शशिकांत मोदी, उपशहरप्रमुख भैया कदम, शाखाप्रमुख राजेश कोळेकर, शिवसेना गटप्रमुख पप्या काणेकर, निपुण बोरगावकर, भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष प्रणय वाडकर, हिंदू जनजागृती समितीचे सुरेश शिंदे, सुरेश राऊत, छत्रपती शिवाजी चौक मित्रमंडळाचे अभिजीत गुरव, सनातन संस्थेचे हेमंत चाळके, विनायक जगताप, दीपक सुर्वे, आदी उपस्थित होते. ‘पीके’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सुरू असलेल्या हिंदूंच्या तीव्र विरोधाचे पडसाद चिपळूण येथे उमटले. शिवसेना व हिंदू जनजागृती समितीने आज या चित्रपटाविरोधात पूजा चित्रपटगृहाचे व्यवस्थापक अविराज भुवड यांना निवेदन सादर केले व आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. चिपळूण-संगमेश्वर विधानसभा क्षेत्राध्यक्ष बाळा कदम यांनी हा चित्रपट त्वरित बंद करण्यात यावा, असे व्यवस्थापकीय संचालक यांच्याशी संपर्क करून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. (वार्ताहर)भुवड यांनी चित्रपटाचे होर्डिंग उतरविल्यानंतर संतप्त लोक शांत झाले. (वार्ताहर)हिंदू जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी पीके या चित्रपटावर आक्षेप घेतल्याने हा चित्रपट बंद करण्यात आला असून दि. ३१ पासून हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार नाही, असे चित्रपटगृहाच्या तिकीट खिडकीवर लिहिण्यात आले आहे. मंगळवारी होणारे सर्व शो बंद करण्यात आले. आगावू घेतल्या गेलेल्या तिकिटांचे पैसे परत देण्याची भूमिकाही व्यवस्थापनाने घेतली आहे.