शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

गोवळकोट स्लॅब मोरीला तिसऱ्यांदा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:33 IST

चिपळूण नगरपरिषद विशेष तातडीची सभा लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील गोवळकोट येथील नाल्याचा ...

चिपळूण नगरपरिषद विशेष तातडीची सभा

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील गोवळकोट येथील नाल्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. या नाल्याचे सांडपाणी थेट नदीपात्रात सोडण्यासाठी स्लॅब मोरी टाकण्याचा प्रस्ताव सोमवारी झालेल्या विशेष तातडीच्या सभेत ठेवला होता. मात्र, शिवसेेनेने त्याला विरोध केल्याने तिसर्‍यांदा ठेवलेला हा प्रस्ताव पुन्हा बारगळला आहे.

नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा ऑनलाईन पद्धतीने आयोजित केली होती. या सभेत कोरोनाच्या परिस्थितीमुळे नगरपरिषदेसाठी रुग्णवाहिका खरेदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यानंतर गोवळकोट रोड येथील नाल्याचा प्रस्ताव ठेवला. करंजेश्‍वरी देवी कमानीपासून लाईफकेअर हॉस्पिटलच्या विहिरीपर्यंत नाला वळविण्याबाबत काही नगरसेवकांनी सुचवले. मात्र त्याला शिवसेनेचे नगरसेवक मोहन मिरगल व अन्य नगरसेवकांनी विरोध केला. त्यामुळे तिसऱ्यांदा ठेवलेला हा प्रस्ताव पुन्हा एकदा बारगळला.

त्यानंतर शिवनदीतील गाळ उपशाबाबत एकमताने निर्णय घेण्यात आला. तसेच या कामासाठी आर्थिक व प्रशासकीय मंजुरीही देण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नगरपरिषद अपरांत हॉस्पिटलच्या माध्यमातून कोविड सेंटर उभारत असून, त्याची पूर्वतयारी जोरदार सुरू केली आहे. त्यासाठी अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुल चहुबाजूने सील करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली. त्यामुळे या सभेत कोविड सेंटरसाठी लागणारे साहित्य व फवारणीची यंत्रणा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.