शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
3
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
4
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
5
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
7
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
10
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
11
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
12
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
13
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
14
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
15
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
16
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
17
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
18
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
19
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
20
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

एनडीए सरकारची भांडाफोड करणार : अनंत गाडगीळ

By admin | Updated: September 21, 2014 00:50 IST

समविचारी पक्षाशी आघाडी करणार

रत्नागिरी : एन. डी. ए. सरकार न्याय व्यवस्थेत हस्तक्षेप, घटनात्मक पदांची अवहेलना, प्रसारमाध्यमांवर दबाव टाकत लोकशाहीच्या सर्व स्तंभांना धक्का देणारे सरकार असल्याची टीका काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय पॅनेल प्रवक्ते आमदार अनंत गाडगीळ यांनी केली. विधानसभा निवडणुका लक्षात घेता गेल्या पाच वर्षात राज्यात केलेले भरीव काम लोकांपर्यत पुस्तिका व संवादाद्वारे मांडली जाणार आहे. निवडणुकीपूर्वी भाजप, एनडीएकडून जनतेला दिलेली आश्वासने व सद्यस्थिती असलेली घूमजावची भूमिका लोकांसमोर मांडणार असल्याचे गाडगीळ यांनी सांगितले.पारदर्शकतेचा बडेजाव करणाऱ्या पंतप्रधानांनी गेल्या तीन परदेश दौऱ्यात एकाही पत्रकाराला सोबत नेले नाही. लोकसभा निवडणुकीच्या भाषणात युपीएने गेल्या दहा वर्षात देशाची वाट लावली असल्याचे मोदी सातत्याने म्हणत असत. परंतु भूतानला नुकतीच मोदी यांनी भेट दिली असता भारताने गेल्या दहा वर्षात नेत्रदीपक प्रगती केल्याचे सांगितले. एनडीए नेते महागाईला काँग्रेसला जबाबदार धरतात मात्र सरकार केंद्रात येताच रेल्वे भाड्यात एकदम १४ टक्के वाढ केली, तसेच तेलाच्या किमंतीत वाढ केल्याचे गाडगीळ यांनी सांगितले.दहशतवाद्यांच्या हल्लयासाठी युपीए ला जबाबदार धरणाऱ्या एनडीए ने १७ लाख खर्चून झालेल्या मोदींच्या शपथविधीस नवाज शरीफ यांना लाल गालिचा अंथरला, एवढे होवूनही बाळासाहेब ठाकरे यांचे अनुयायी गप्प राहतात, याबद्दल आश्चर्य वाटत असल्याचे गाडगीळ यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईला बी.ए.आर.सी ला भेट देतात तेव्हा ‘अणूऊर्जा हीच एकमेव उर्जा’, म्हणतात तेव्हा जैतापूरच्या प्रश्नावर रान उठवू म्हणणारे शांत का ? असा सवालही गाडगीळ यांनी उपस्थित केला आहे.(प्रतिनिधी)