शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काॅंग्रेसने केला रत्नागिरीतील डाॅक्टरांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:22 IST

रत्नागिरी : डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षातर्फे रत्नागिरी शहरातील डाॅक्टरांचा सत्कार करण्यात आला. शहरातील शासकीय व खासगी ...

रत्नागिरी : डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षातर्फे रत्नागिरी शहरातील डाॅक्टरांचा सत्कार करण्यात आला. शहरातील शासकीय व खासगी डाॅक्टरांची भेट घेऊन त्यांच्या सेवेबद्दल राष्ट्रवादी काॅंग्रेसतर्फे कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

गेले दीड वर्ष जगात कोरोनाने थैमान घातलेले असून, अनेक रुग्ण मृत्यूमुखी पडत असताना, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जगातील अनेक डॉक्टर्स या रुग्णांची सेवा करून रुग्णांना बरे करायचा प्रयत्न करत आहेत. या काळात डॉक्टरांवर अनेक प्रकारचे ताण असतात. याही परिस्थितीत आपला सेवाधर्म जाणून अनेक डॉक्टर्स सेवा देत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या उपक्रमाचे आयाेजन केले हाेते.

रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले - गावडे, महिला कोविड रुग्णालय सांभाळणारे डॉ. विकास कुमरे, स्वस्तिक हाॅस्पिटलचे रमेश चव्हाण, सुनीता चव्हाण, डाॅ. अलिमियाॅं परकार, डॉ. मतीन परकार यांच्यासह अन्य डाॅक्टरांचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रवादी काॅंग्रेस डॉक्टर्स सेलचे अध्यक्ष डॉ. सुर्वे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व रोपटे देऊन डाॅक्टरांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते कुमार शेट्ये, जिल्हा सरचिटणीस सचिन कोतवडेकर, शहराध्यक्ष नीलेश भोसले, युवक चिटणीस बंटी वणजू, उपाध्यक्ष सनीफ गवाणकर, सरचिटणीस रणजित शिर्के, यशवंत डोर्लेकर, पप्पू तोडणकर, पावस विभाग अध्यक्ष सज्जन लाड, विद्यार्थी तालुकाध्यक्ष सुरज शेट्ये, शहराध्यक्ष साई शिवलकर, समीर भोसले, चिटणीस प्रथमेश कांबळे, सौरभ वायंगणकर, अक्षय मजगावकर, प्रल्हाद शिंदे, संतोष पाटोळे उपस्थित होते.

--------------------------

डाॅक्टर्स दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काॅंग्रेसतर्फे जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले - गावडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित हाेते.