शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक निकालः राष्ट्रवादीनं कोकणात उघडलं खातं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 16:14 IST

शिवसेनेचे विद्यमान आमदार सदानंद चव्हाण यांना चिपळूणमधून पराभूत करत राष्ट्रवादीचे शेखर निकम विजयी झाले आहेत.

 

रत्नागिरीः शिवसेनेचे विद्यमान आमदार सदानंद चव्हाण यांना चिपळूणमधून पराभूत करत राष्ट्रवादीचे शेखर निकम विजयी झाले आहेत. फक्त अधिकृत घोषणा होण्याची बाकी आहे. महायुतीचे उमेदवार सदानंद चव्हाण हे तिसऱ्यांदा विधानसभा निवडणूक लढवत होते. 2009 आणि 2014मध्ये विधानसभा निवडणूक लढवत त्यांनी विजय मिळवला होता. परंतु या निवडणुकीत त्यांचा पराभव जवळपास निश्चित मानला जात आहे.

राष्ट्रवादीच्या शेखर निकम यांनी 29297 हजारांहून अधिकची विजयी आघाडी घेतली आहे. 2014 साली शिवसेनेच्या सदानंद चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या शेखर निकम यांचा पराभव केला होता. त्यावेळी सदानंद चव्हाण यांना 75695, तर शेखर निकम यांना 69,627 मतं मिळाली होती. परंतु या निवडणुकीत शेखर निकम विजय मिळवणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे.  

चिपळूणमधील शिवसेनेची जागा धोक्यात असल्याचा आणि तेथे चुरशीची निवडणूक होणार असल्याचा अंदाज आधीपासूनच होता. भास्कर जाधव राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झाल्यामुळे शिवसेनेची मते वाढतील, असा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात शिवसेनेला चिपळुणात जोरदार फटका बसला आहे. शेखर निकम यांना १ लाख १ हजार ५७८ तर सदानंद चव्हाण यांना ७१ हजार ६५४ मते मिळाली आहेत.गत निवडणुकीत हेच दोन उमेदवार आमनेसामने होते. त्यात सदानंद चव्हाण सहा हजार मतांनी विजयी झाले होते. पराभूत झाल्यानंतर लगेचच शेखर निकम यांनी मतदार संघात कामाला सुरूवात केली होती. सत्ता नसतानाही अनेक ठिकाणचे पाणीप्रश्न त्यांनी स्वबळावर सोडवले. त्यामुळे यावेळी जिल्ह्यात या मतदार संघात बदल होण्याची शक्यता आधीपासून वर्तवण्यात येत होती.गुरूवारी मतमोजणी सुरू झाल्यापासूनच शेखर निकम यांनी आघाडी घेण्यास सुरूवात केली. त्यांना दर फेरीमध्ये मिळणारी आघाडी पाहून आठव्या फेरीनंतर शिवसेनेचे उमेदवार सदानंद चव्हाण मतमोजणी कक्षातून निघून गेले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019chiplun-acचिपळूण