शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याधिकारी नसल्याने मंडणगडात गैरसोय

By admin | Updated: June 30, 2016 00:04 IST

नगरपरिषद : दाखले, परवाने मिळण्यात अडचण...!

मंडणगड : मंडणगड नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी म्हणून पदभार असलेल्या तहसीलदार वैशाली जाधव यांची दापोली येथे बदली झाल्यामुळे नगरपंचायतीचे मुख्याधिकारीपद अद्याप रिक्त आहे. मुख्याधिकारी नसल्यामुळे विद्यार्थ्यांना विविध दाखले व नागरिकांना परवाने मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे. येथे तत्काळ मुख्याधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी येथील नगरसेवकांनी केली आहे. मंडणगड नगरपंचायत अस्तित्त्वात आल्यानंतर येथील तहसीलदार दळवी यांच्याकडे अतिरिक्त पदभार होता. परंतु, एक महिन्यापूर्वी तहसीलदार जाधव यांची दापोली येथे बदली झाली. त्यामुळे त्यांनी नगरपंचायतीचा पदभार सोडला किंवा कसे? याबाबत माहिती उपलब्ध नाही. परंतु, मंडणगड येथे पावणेकर हे नवीन तहसीलदार म्हणून हजर झाले. त्यांना नगरविकास खात्याचे आदेश नसल्यामुळे त्यांनी नगरपंचायतीचा पदभार स्वीकारलेला नाही. गेला महिनाभर शहरातील नागरिकांचे विविध परवाने, पावसाळ्यात करावयाची उपाययोजना किंवा प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारे विद्यार्थ्यांचे दाखले अशी महत्त्वपूर्ण कामे मुख्याधिकाऱ्यांअभावी रखडलेली आहेत. नागरिकांची व विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन सर्व नगरसेवकांनी मंगळवारी तहसीलदार पावणेकर यांची भेट घेतली. तहसीलदारांनी आपल्याला नगरविकास खात्याचे कोणतेही अधिकार नाहीत, त्यामुळे आपण पदभार स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले. नगरसेवकांनी आमदार संजय कदम यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. परंतु, तहसीलदारांनी त्यांनाही तेच उत्तर दिले.आदेश नसताना परस्पर पदभार स्वीकारणे अयोग्य असल्याचे तहसीलदारांनी स्पष्ट केले. त्यामुळे येथे कायमस्वरुपी मुख्याधिकारी मिळावा, अशी मागणी नगरसेवकांसह नागरिकांनी केली आहे. दरम्यान, मंडणगडमध्ये मुख्याधिकारी नसल्याने नागरिकांचीही कामे खोळंबली आहेत. याबाबत कायमस्वरुपी तोडगा काढावा, अशी मागणी मंडणगडातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)तहसीलदार : पदभार स्वीकारण्यास नकारतहसीलदारांची बदली झाल्यामुळे नवीन अधिकारी नाही. नगरविकास खात्याचे आदेश नसल्याने नवीन तहसीलदारांचा पदभार स्वीकारण्यास नकार.मंगळवारी सर्व नगरसेवकांनी घेतली तहसीलदारांची भेट. आमदार संजय कदम यांची शिष्टाईही असफल.विद्यार्थी, नागरिक यांना दाखले मिळत नसल्याने नाराजी. तत्काळ मुख्याधिकारी देण्याची नगरसेवकांची मागणी.