शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याधिकाऱ्यांचा युतीला ‘दे धक्का’

By admin | Updated: July 11, 2014 00:04 IST

रत्नागिरी पालिका : व्यापारी गाळ्यांचे काढले सील

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेने सील केलेल्या स्वमालकीच्या १२ पैकी १० व्यापारी गाळ्यांचे सील (बुधवारी) सायंकाळी उशिरा मालमत्ता विभागाने काढले. या गाळेधारकांकडून केवळ २५ टक्के अर्थात ३७ लाख ८५ हजार थकबाकीची रोखीत वसुली झाली आहे. पूर्ण थकबाकी भरल्याशिवाय गाळ्यांचा ताबा देऊ नये, अशी सत्ताधारी महायुतीची मागणी धुडकावत सत्ताधाऱ्यांच्या नाकावर टिच्चून मुख्याधिकारी रंजना गगे यांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे मुख्याधिकारी व महायुती यांच्यात कलगी-तुरा रंगला आहे. सेना-भाजप महायुती याबाबतची आपली भूमिका शुक्रवारी जाहीर करणार असल्याचे भाजप गटनेते अशोक मयेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी स्टेडियममधील पालिकेच्या १२ गाळ्यांचे पावणेदोन कोटी रुपये भाडे गेल्या ३० वर्षांपासून थकीत आहे. त्यामुळे २ जुलै रोजी हे १२ गाळे पालिकेने सील केले होते. किती रक्कम स्वीकारून गाळ्यांचे सील काढावे, हा आपला अधिकार असल्याचे गगे यांनी सुनावले होते. मुख्याधिकारी गगे यांनी मालमत्ता विभागाला दिलेल्या आदेशानुसार कोणताही गाजावाजा न करता बुधवारी सायंकाळी उशिराने १० गाळ्यांचे सील काढून ते संबंधित भाडेकरूंच्या ताब्यात देण्यात आले. १२पैकी १० गाळेधारकांकडून २५ टक्के अर्थात ३७ लाख ८५ हजार एवढी थकबाकी स्वीकारण्यात आली आहे. थकबाकीचा २५ टक्के रकमेचा दुसरा हप्ता म्हणून त्या रकमेचे १९ व २० आॅगस्ट २०१४ या तारखेचे धनादेश प्रत्येक गाळेधारकाकडून घेण्यात आले आहेत. उर्वरित ५० टक्के रक्कमही डिसेंबर २०१४ पर्यंत पूर्णत: भरावयाची असून, त्यासाठीचे हप्तेवजा धनादेशही स्वीकारण्यात आले आहेत. हे धनादेश बॅँकेत वटले नाहीत तर पालिका जी कारवाई करील ती मान्य असेल, असे १०० रुपयांच्या बॉन्डवर या दहा जणांनी लिहून दिले आहे. ५० लाख थकीत घरपट्टीचे धनादेशही पालिकेने स्वीकारले. (प्रतिनिधी)