आता वेळेत स्थानकात न आल्यास रेल्वे चुकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 10:29 AM2020-10-29T10:29:07+5:302020-10-29T10:31:15+5:30

coronavirus, Konkan Railway, ratnagirinews वारंवार सूचना करून ही तपासणीकरीता रेल्वेच्या वेळेच्या पूर्वी स्थानकात उपस्थित न राहणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत कोकण रेल्वे आता कडक पाऊले उचलणार आहे.  उशिरा आल्याने तपासणी न होणाऱ्या प्रवाशांचा रेल्वेतील प्रवेश अडचणीत येणार आहे. कोकण रेल्वे रत्नागिरी, सिंधुदुर्गातील सर्वच स्थानकात या बाबतची कडक अंमलबजावणी करणार आहे.

If you don't arrive at the station on time, the train will miss | आता वेळेत स्थानकात न आल्यास रेल्वे चुकणार

आता वेळेत स्थानकात न आल्यास रेल्वे चुकणार

googlenewsNext
ठळक मुद्दे कोकण रेल्वे कडून विशेष सूचना सर्वच स्थानकात कडक अंमलबजावणी

रत्नागिरी : वारंवार सूचना करून ही तपासणीकरीता रेल्वेच्या वेळेच्या पूर्वी स्थानकात उपस्थित न राहणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत कोकण रेल्वे आता कडक पाऊले उचलणार आहे.  उशिरा आल्याने तपासणी न होणाऱ्या प्रवाशांचा रेल्वेतील प्रवेश अडचणीत येणार आहे. कोकण रेल्वेरत्नागिरी, सिंधुदुर्गातील सर्वच स्थानकात या बाबतची कडक अंमलबजावणी करणार आहे.

कोविडचा धोका पूर्णतः टळलेले नाही या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे सर्व स्थानकांवर प्रवाशांची प्रवासापूर्वी आरोग्य व अन्य तपासणी करत आहे. याकरीता रेल्वेच्या निर्धारित वेळेपूर्वी प्रवाशांनी किमान एक तास आधी स्थानकात उपस्थित रहावे, असे आवाहन गेले काही दिवस कोकण रेल्वे करत आहे.

या आवाहनाला प्रवाशांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. मात्र, काही ठराविक प्रवासी ऐनवेळी स्थानकात दाखल होत असल्याने रेल्वे सुटण्याच्या वेळी गोंधळाची स्थिती निर्माण होते आहे. आता अशा प्रवाशांच्या बाबतीत कठोर धोरण अवलंबले जाणार आहे. यामुळे ऐनवेळी येणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या बाहेर रहावे लागण्याची भीती आहे.

कोविडचा प्रसार होऊ नये यासाठी कोकण रेल्वे सर्व त्या खबरदारी घेत आहे. हे सर्व उपाय हे प्रवाशांच्या आरोग्याच्या हिताचे आहेत. या सगळ्या करीता कोकण रेल्वेचे सर्व कर्मचारी अधिकारी सर्व स्थानकात अहोरात्र मेहनत घेत आहेत.

त्यांच्या या प्रयत्नांना प्रवाशांची साथ अपेक्षित आहे. त्यामुळे तुम्ही जर कोकण रेल्वेने प्रवास करत असाल तर निर्धारित वेळे पूर्वी किमान पाऊण तास आधी रेल्वे स्थानकात पोहोचा अन्यथा सुरक्षा तपासणी झाली नाही तर तुमची रेल्वे चुकू शकते.

Web Title: If you don't arrive at the station on time, the train will miss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.