तौक्तेतील लाभार्थींसाठी दोन कोटींचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:22 IST2021-07-02T04:22:12+5:302021-07-02T04:22:12+5:30

राजापूर : मे महिन्यात तालुक्यात ताैक्ते वादळात नुकसान झालेल्या लाभार्थींसाठी सुमारे दोन कोटी ६६ लाखांचे अनुदान येथील तालुका प्रशासनाला ...

Grant of Rs. 2 crore for the beneficiaries of Taukt | तौक्तेतील लाभार्थींसाठी दोन कोटींचे अनुदान

तौक्तेतील लाभार्थींसाठी दोन कोटींचे अनुदान

राजापूर : मे महिन्यात तालुक्यात ताैक्ते वादळात नुकसान झालेल्या लाभार्थींसाठी सुमारे दोन कोटी ६६ लाखांचे अनुदान येथील तालुका प्रशासनाला प्राप्त झाले आहे. तालुक्याला बसलेल्या तौक्ते वादळात कृषिक्षेत्रातील १७७८, तर अन्य पडझडीचे ५६७ लाभार्थींचा त्यामध्ये सामावेश आहे.

तौक्ते वादळाचा कोकणच्या किनारपट्टीवरील गावांना व परिसराला तडाखा बसला होता. राजापूर तालुक्यातही तौक्ते वादळाने मोठे नुकसान केले होते. या वादळामुळे घरांवरील छप्परे उडाली होती. गोठ्यांचे नुकसान झाले होते. कृषिक्षेत्रालाही वादळाचा फटका बसला होता. मच्छिमारांचेही नुकसान झाले होते. जवळपास २३४५ लाभार्थींचे नुकसान झाले होते. त्यामध्ये १७७८ कृषी, तर ५६७ अन्य पडझडीचे लाभार्थी होते.

तालुक्यात वादळात झालेल्या नुकसानाचे पंचनामे झाले होते आणि सुमारे दीड कोटीच्या आसपास नुकसानभरपाईची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार शासन स्तरावरून तत्काळ जिल्ह्यातील वादळग्रस्तांसाठी भरपाईची रक्कम मंजूर करण्यात आली. त्यामध्ये जवळपास दोन कोटी ६६ लाख रुपये अनुदान राजापूरसाठी प्राप्त झाले आहे, अशी माहिती तालुका प्रशासनातर्फे देण्यात आली.

Web Title: Grant of Rs. 2 crore for the beneficiaries of Taukt