वेळेनंतरही दुकान उघडे, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:34 AM2021-05-11T04:34:06+5:302021-05-11T04:34:06+5:30

रत्नागिरी : शासनाने ठरवून दिलेल्या वेळेनंतरही आपले किराणा मालाचे दुकान उघडे ठेवून ग्राहकांना समक्ष किराणा माल दिल्याप्रकरणी एकाविरोधात शहर ...

Even after the time the shop is open, the crime is filed | वेळेनंतरही दुकान उघडे, गुन्हा दाखल

वेळेनंतरही दुकान उघडे, गुन्हा दाखल

Next

रत्नागिरी : शासनाने ठरवून दिलेल्या वेळेनंतरही आपले किराणा मालाचे दुकान उघडे ठेवून ग्राहकांना समक्ष किराणा माल दिल्याप्रकरणी एकाविरोधात शहर पोलीस स्थानकात दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवार, ९ मे रोजी दुपारी ११.१० वाजण्याचा सुमारास रवींद्रनगर ते कारवांचीवाडी जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आली.

याप्रकरणी ओमसिंग भवरसिंग पुरोहित (२५, रा. भवानीनगर खेडशीनाका, रत्नागिरी) याच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस नाईक रोशन चंद्रकांत सुर्वे यांनी तक्रार दिली होती. रविवारी सकाळी ओमसिंग पुरोहित हा आपल्या मालकीचे खेतेश्‍वर किराणा मालाचे दुकान उघडे ठेवून स्वतःमुळे कोरोना संसर्ग होऊन दुसऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, हे माहिती असूनही ग्राहकांना समक्ष किराणा माल देत होता. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.

Web Title: Even after the time the shop is open, the crime is filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.