शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
4
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
5
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
6
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
7
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
8
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
9
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
10
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
11
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
12
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
13
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
14
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
15
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
16
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
17
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
18
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
19
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
20
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
Daily Top 2Weekly Top 5

युद्धाची झळ स्वयंपाकघरापर्यंत, खाद्यतेलाचा उडाला भडका; एका आठवड्यात किलोमागे १२ रुपयांची झाली वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 17:35 IST

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीत ३० टक्के दर वाढ

रत्नागिरी : अमेरिका-इराण युद्धाची झळ आता थेट स्वयंपाकघरापर्यंत पोहोचली आहे. युद्धामुळे खाद्यतेल पुरवठ्यात समस्या निर्माण झाली आहे. ज्या वस्तू आयात केल्या जात आहेत, त्या वस्तूंच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या दरात गेल्या आठवडाभरात प्रतिकिलो तब्बल बारा रुपयांची वाढ झाली आहे. दि. १ मार्च रोजी १३३ ते १३५ रुपये किलो दराने असणारे सोयाबीन खाद्यतेल सध्या १४५ ते १४७ रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. सोयाबीनचेही दर वाढले आहेत.

भारत-अमेरिका व्यापार करारामुळे सोयाबीनच्या किमती ५०० रुपये प्रतिक्विंटल कमी झाल्या होत्या. मात्र, मध्य पूर्व देशातील युद्धामुळे व कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने सोयाबीनचा दर प्रतिक्विंटल सहा हजार रुपये झाला आहे. भारताने एप्रिल ते जुलै या कालावधीत ७५ हजार मेट्रिक टन सोयाबीन आयात करण्याचा साैदा केला होता. मात्र, युद्धामुळे तो रद्द झाला आहे. त्यामुळे आता रिफाइंड तेलाच्या किमती वाढल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीत ३० टक्के दर वाढ झाली असल्यामुळे ग्राहकांना याचा फटका बसत आहे. त्याशिवाय अतिवृष्टीमुळे यावर्षी सोयाबीनचे उत्पादन कमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत युद्ध थांबले नाही तर आणखी दरवाढ होण्याची भीती आहे.

सोयाबीन, पामोलिन, सूर्यफूल यांसारख्या खाद्यतेलांची आयात मलेशिया, इंडोनेशिया, अर्जेंटिना, ब्राझील या देशांतून केली जाते. मात्र, मध्यपूर्व देशांतर्गत असलेल्या तणावात्मक परिस्थितीची झळ जलवाहतुकीलाही बसली आहे. जलवाहतुकीच्या खर्चात वाढ झाली असल्याने आयात होणाऱ्या खाद्यतेलाच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. वाहतुकीतील अडथळे, जहाजांच्या मार्गातील बदल व वाढलेला विमा खर्च यामुळे आयात वस्तूंमध्ये दरवाढ झाली आहे.

खाद्यतेलाचे प्रकार - पूर्वीचे दर - आताचे दर

  • सोयाबीन - १३३ - १४५
  • सूर्यफूल - १५७ - १६५
  • राइस ब्रँड - १३६ - १४०
  • शेंगदाणा - १५२ - १६०

सध्या उत्सव, सण, लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे खाद्यतेलासाठी वाढती मागणी आहे; परंतु मध्यपूर्व देशातील युद्धामुळे आयातीवर परिणाम झाल्याने खाद्यतेलाच्या किमती भडकल्या आहेत. - सूर्यकांत जाधव, विक्रेता

English
हिंदी सारांश
Web Title : War's Impact: Cooking Oil Prices Soar, ₹12/kg Increase in Week

Web Summary : The US-Iran conflict disrupts cooking oil supplies, raising prices. Soybean oil increased by ₹12/kg in a week due to import issues and rising crude oil costs. Reduced soybean production exacerbates the situation, threatening further price hikes if the conflict persists.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरOil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्प