शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदाराअभावी रखडल्या कृषिपंपांच्या जोडण्या

By admin | Updated: June 29, 2016 23:58 IST

महावितरण कंपनी : डोंगराळ भागामुळे उदासीनता

रत्नागिरी : कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना वीजजोडण्या दिल्या जातात. भौगोलिकदृष्ट्या रत्नागिरी जिल्हा डोंगराळ भागात वसलेला आहे. वीजजोडण्यांसाठी महावितरण ठेकेदारांची नियुक्ती करते. डोंगराळ भागातील कामासाठी ठेकेदार तयार होत नाहीत. त्यामुळे कृषी विभागाच्या १ हजार १२४ जोडण्या रखडल्या आहेत.जिल्ह्यातील अनेक बेकार युवक रोजगार न मिळाल्याने सामूहिक शेती करीत आहेत. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली विविध भाजीपाला, फळभाज्यांचे उत्पादन घेण्यात येत आहे. पावसाळी शेती बरोबर बारमाही शेतीसाठी प्रयत्नशील असलेल्या शेतकऱ्यांकडून कृषिपंपांच्या जोडण्या घेण्यात येतात. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत विजेचे खांब टाकून वीज जोडण्या दिल्या जातात. डोंगराळ भागातील कामासाठी ठेकेदार तयार होत नाहीत. शिवाय त्यासाठी दर अधिक मागण्यात येऊनसुध्दा दर देण्यात येत नाहीत. रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षी ५०० वीज जोडण्यांचे उद्दिष्ट असताना ठेकेदारांअभावी जोडण्यांची उद्दिष्ट पूर्ती होण्यात अडथळा येत आहे. पैसे भरूनही जोडण्या न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील तरूणवर्ग आता सजग झाला आहे. नोकरीच्या मागे न लागता शेतीकडे वळण्याची मानसिकता तयार होत आहे. त्यामुळे कृषिपंपाच्या जोडण्या प्राधान्याने देणे गरजेचे आहे. ११२४ वीज जोडण्यांपैकी ६८० कृषिपंप आरक्षित कोट्यातील आहेत, तर ४४४ खुल्या गटातील आहेत. वर्षभरात केवळ ३१४ जोडण्या देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी विभागात २४२, चिपळूण विभागात १०४, खेड विभागात ९८ कृषिपंपाची यादी प्रलंबित आहेत.पावसाळा सुरू झाल्यामुळे सध्या नवीन कनेक्शन देण्याचे काम बंद आहे. पावसाळ्यात खोदाईसाठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर काम सुरू होईल. परंतु येत्या वर्षभरात ११२४ कृषिपंप शंभर टक्के देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. प्रलंबित यादी वर्षभरात संपवण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. (प्रतिनिधी)