शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेचा घनकचरा प्रकल्प अडचणींच्या फेऱ्यात -

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2015 22:50 IST

-शहर विकासाचे स्वप्न भाग-३

रत्नागिरी : रत्नागिरी शहर हे जिल्ह्याची राजधानी असून, राजधानीसारख्या सुविधा या शहरात असाव्यात, ही सर्वांचीच अपेक्षा आहे. मात्र, त्यासाठी सहकार्याची जी भावना हवी, त्याचा अभाव दिसून येत आहे. त्यातूनच गेल्या पंधरा वर्षांपासून शहरातील दररोज जमा होणाऱ्या २२ टन कचऱ्याचे करायचे काय, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दांडेआडोम येथील घनकचरा प्रकल्प स्थानिकांच्या विरोधामुळे रखडला आहे. त्यामुळे शहराच्या जवळच घनकचऱ्यावर प्रक्रिया करणारा मोठा प्रकल्प उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. या घनकचरा प्रकल्पाला मुहूर्त कधी मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.रत्नागिरी पालिकेने घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम २०००ची अंमलबजावणी करण्यासाठी दांडेआडोम येथील पालिकेच्या मालकीच्या जागेपर्यंत जाण्यासाठी आवश्यक रस्त्याच्या जागेचा प्रश्न अलिकडेच सोडविला. संपादन करून ही जागा जिल्हा प्रशासनाने पालिकेच्या ताब्यात दिली. त्यानंतर दांडेआडोम घनकचरा प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला, असे चित्र होते. मात्र, स्थानिकांच्या विरोधामुळे हा विषय न्यायालयात गेला. सध्या साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरण प्रकल्पाच्या आवारातील मोठ्या जागेत कचऱ्याचे संकलन केले जात आहे. दांडेआडोम प्रकल्पाला स्थानिकांनी केलेल्या विरोधामुळे व केलेल्या युक्तिवादामुळे जिल्हा न्यायालयात या प्रकल्पाला मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे या निर्णयाला पालिकेने उच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. त्याबाबतचा निर्णय यावयाचा आहे. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेत रत्नागिरी नगरपरिषदेचे ८२ शहरांच्या यादीत नाव समाविष्ट आहे. घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात उच्च न्यायालयाने आखून दिलेल्या कालबध्द कार्यक्रमानुसार रत्नागिरी नगरपरिषदेची कार्यवाही सुुरू आहे. मात्र, दांडेआडोमचा प्रकल्प न्यायालयीन प्रक्रियेत अडकला आहे. घनकचरा प्रकल्प उभारणीबाबत सर्वच बाजूंनी कोंडी झाल्यानंतर ही कोंडी फोडण्यासाठी अनेक पर्याय सुचविले गेले. प्रत्येक प्रभागात छोट्या स्वरूपातील घनकचरा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला. त्यासाठी दोन प्रभागात जागांची पाहणीही करण्यात आली. पुढे काहीच झाले नाही. (प्रतिनिधी)स्मार्ट रत्नागिरीपुढे कचऱ्याची समस्यारत्नागिरी शहरात दरदिवशी संकलित होणारा २२ टन कचरा साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरण प्रकल्पाच्या आवारात गेल्या काही वर्षांपासून डंप केला जात आहे. तेथे सध्या कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. नगरपरिषदेला शासनाने याआधीच कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, नगरपरिषदेला गेल्या पंधरा वर्षांच्या काळात घनकचरा प्रकल्प उभारणीसाठी शहराच्या जवळ आवश्यक जागा मिळाली नाही. स्मार्ट शहरासाठी प्रयत्न करणाऱ्या रत्नागिरी शहरासाठी ही बाब चांगली नाही. पालिकेत कारभार पाहणाऱ्यांचे हे अपयश असल्याची टीकाही आता होऊ लागली आहे. गंजलेली जलवाहिनी बदलावीशहरातील कचऱ्याचे ढीग आणि जलशुध्दिकरण प्रकल्प साळवी स्टॉप येथे एकाच ठिकाणी आहेत. या जलशुध्दिकरण प्रकल्पापासून शीळ धरणापर्यंत गेलेली जलवाहिनी ही पूर्णत: गंजली असून, जागोजागी फुटली आहे. त्यातून दररोज पाण्याची मोठी गळती सुरू आहे. या गळतीमुळे येणाऱ्या पाण्याचा जोर कमी होतोच व पाणीही वाया जात आहे. त्याचाही विचार करून नवीन जलवाहिनी लवकरात लवकर होणे शहरवासीयांसाठी महत्त्वाचे आहे.