शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांच्या बड्या नेत्याला विनातिकीट ठाकरे गटात प्रवेश; कोकणात मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 14:58 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते अजित यशवंतराव यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.

Ajit Yashwantrao Join UBT : विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर जागावाटपाच्या चर्चा होत असतानाच उपुमख्यमंत्री अजित पवारांना धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मंगळवारी अजित पवारांना जोरदार झटका दिला आहे. राष्ट्रवादीच्या कोकणातील बड्या नेत्याने उद्धव ठाकरेंच्या  शिवसेनेत प्रवेश केला आहे. राजापूर लांजा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे नेते अजित यशवंतराव यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे कोकणात अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे.

रत्नागिरीत राष्ट्रवादी काँग्रेसला उद्धव ठाकरेंनी झटका दिला आहे. राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते अजित यशवंतराव यांनी हातात शिवबंधन बांधले आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अजित यशवंतराव यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून अजित यशवंतराव यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी तरुण, उमदा, सुशिक्षित आणि मनापासून काम करणारा तरुण शिवसेनेत आल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

"काही दिवसांपूर्वी आपण आलात तेव्हा मी त्यांना भेटलो होतो असं विचारलं. सात वर्षांनी तुम्ही शिवसेना परिवारात आलात. कोणतीही राजकीय अपेक्षा न ठेवता पक्षात आला आहात. अनेक जण पक्षात येऊ इच्छितात पण त्यांना तिकीट हवं असतं. तुम्ही विनातिकीट आला आहात. विनातिकीट आल्याने माझी जबाबदारी आहे की तुमचा पुढचा प्रवास सुखकर व्हायला हवा. आताचा काळ आपल्या संघर्षाचा काळ आहे. पक्ष, चिन्ह चोरलेलं आहे. आता आपली नवीन निशाणी मशाल आहे. या निशाणीवर आपले नऊ खासदार निवडून दिलेत. ही मशाल मनामनात पोहोचलेली आणि पेटलेली आहे. त्यांच्याकडे सत्ता आहे तसे माझ्याकडे तुमच्यासारखी जीवाला जीव देणारी माणसे आहेत. सगळ्यांसमोर सांगतो तुमच्या भविष्याची जबाबदारी माझी आहे," असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरेrajapur-acराजापूरAjit Pawarअजित पवार