रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर नाणीजजवळ अजस्त्र वृक्ष कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 12:20 PM2020-06-03T12:20:26+5:302020-06-03T12:22:05+5:30

रत्नागिरी तालुक्यातील नाणीजजवळील नवीन मठाजवळ निसर्ग चक्रीवादळाच्या प्रकोपाने अजस्त्र वृक्ष बुधवारी सकाळी उन्मळून पडला. स्थानिकांच्या मदतीने उन्मळून पडलेला वृक्ष रस्त्यावरून बाजूला काढला गेला.

Ajastra tree fell near Nanij on Ratnagiri-Kolhapur highway | रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर नाणीजजवळ अजस्त्र वृक्ष कोसळला

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर नाणीजजवळ अजस्त्र वृक्ष कोसळला

Next
ठळक मुद्देरत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर नाणीजजवळ अजस्त्र वृक्ष कोसळलानिसर्ग चक्रीवादळाचा प्रकोप, अर्धा तास वाहतुकीचा खोळंबा

रत्नागिरी : तालुक्यातील नाणीजजवळील नवीन मठाजवळ निसर्ग चक्रीवादळाच्या प्रकोपाने अजस्त्र वृक्ष बुधवारी सकाळी उन्मळून पडला. स्थानिकांच्या मदतीने उन्मळून पडलेला वृक्ष रस्त्यावरून बाजूला काढला गेला.

अर्धा तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. नाणीज येथील तलाठी, पोलीस पाटील नितीन कांबळे, उपसरपंच दत्ताराम खावडकर, यांचेसहित अनेक ग्रामस्थ त्वरीत घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांच्या मदतीने पडलेला वृक्ष बाजूला करण्यात आला. त्यानंतर वाहतूक सुरळीतपणे सुरू झाली.

सध्या रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर अनेक ठिकाणी असे जुनाट आणि धोकादायक वृक्ष आहेत त्यामुळे प्रवाशांनी प्रवास करताना सावधानता बाळगणे गरजेचे आहे. संपूर्ण पावसाळाभर ही दक्षता घेणे गरजेचे आहे.

Web Title: Ajastra tree fell near Nanij on Ratnagiri-Kolhapur highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.