शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूनंतर त्यांनी अंधांना दिली दृष्टी अन् मेडिकल विद्यार्थ्यांना ज्ञान

By admin | Updated: September 30, 2014 00:13 IST

समाजाचे आपण काही देणं लागतो. या भावनेने

चिपळूण : नेत्रदान हे सर्वांत महान दान आहे. आपण समाजात जन्मलो. त्या समाजाचे आपण काही देणं लागतो. या भावनेने काहीजण विविध क्षेत्रात काम करीत असतात. चिपळूण शहरातील मार्कंडी येथील वंदना सुहास पंडित (४७) यांनी मरणोत्तर नेत्रदान व देहदान केल्याने समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. त्यांच्या नेत्रदानाने अंधाला दृष्टी मिळाली आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी आशिर्वाद मिळाला.सह्याद्री निसर्गमित्र व संघर्ष क्रीडा मडळ या सामाजिक संस्थेतर्फे प्रथमच कोकणात नेत्रदान मोहीम राबवण्यात आली. यादरम्यान काहींची मृत्यूपश्चात नेत्रदानाची संकल्पपत्र भरुन घेण्यात आली होती. यामध्ये सुहास पंडित व त्यांच्या पत्नी वंदना यांचा समावेश होता. मार्कंडी येथे वास्तव्यास असलेल्या वंदना यांना थोडासा ताप आला म्हणून त्यांना देवधर यांच्या दवाखान्यात रविवारी दाखल करण्यात आले. दरम्यान, रात्री १०.४५ वाजता त्यांचे निधन झाले. सह्याद्री निसर्ग मित्रचे सचिव उदय पंडित यांना याबाबत सांगण्यात आले. डॉ. ग. ल. जोशी यांच्याकडे संबंधित संस्थेच्या कार्यकर्त्यांनी संपर्क साधला. रात्री ११.१५ वाजता डॉ. जोशी हे दवाखान्यात आले. त्यांनी वंदना पंडित यांचे नेत्र (कॉर्निया) काढून सह्याद्रीच्या कार्यकर्त्यांकडे सुपूर्द केले. सह्याद्री निसर्गचे अध्यक्ष भाऊ काटदरे यांनी हे दृष्टीदान आयबँक, सांगली येथील डॉ. किल्लेदान यांच्या स्वाधीन केले. वंदना पंडित यांच्या नेत्रदानाने आता अंधांना जग पाहता येणार आहे. सामाजिक बांधिलकीचा वसा जपणाऱ्या पंडित कुटुंबीयांनी नेत्रदानावरच न थांबता वंदना यांचे मरणोत्तर देहदानही केले. कृष्णा आयुर्विमा संस्था अमिमन विद्यापीठ, कराडद्वारा कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टकडे संपर्क साधून आज (सोमवारी) त्यांचा मृतदेह संस्थेकडे देहदान म्हणून पाठवण्यात आला. वर्षभरापूर्वी जनजागृतीचा उपक्रम सह्याद्री निसर्ग मित्र व संघर्ष क्रीडा मंडळाने राबवला होता. त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. ज्या व्यक्तिंना नेत्रदान करायचे आहे, त्यांनी अध्यक्ष भाऊ काटदरे, खजिनदार कमलाकर बेंडके यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)समाजासमोर ठेवला एक आदर्श.अंध व्यक्तिला मिळणार दृष्टी.सह्याद्री निसर्ग मित्रच्या आवाहनाला प्रतिसाद.कोकणात प्रथमच नेत्रदान मोहीम.सह्याद्रीच्या कार्यकर्त्यांनी धावाधाव करून नेत्र काढण्यात मिळवले यश.