शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

एका दिवसात तब्बल १० बंधारे

By admin | Updated: October 18, 2015 23:59 IST

नायशी ग्रामस्थांचा विक्रम : प्रांताधिकारी यांच्याकडून कौतुकाची थाप

असुर्डे : पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाणी टंचाई भासण्याची गरज आहे. त्यामुळे जिल्ह्यात विजय बंधारे बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याअंतर्गत चिपळूण तालुक्यातील नायशी येथील ग्रामस्थांनी एका दिवसात १० बंधारे बांधून विक्रम केला आहे. त्यांच्या या कामाचे प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांनी कौतुक केले आहे.गावचे नूतन सरपंच किशोर घाग यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतरच जलशिवार योजना, ग्रामपंचायत स्तरावर मागासवर्गीयांना शिष्यवृत्ती तसेच अन्य विकासात्मक कामांना प्रारंभ केला आहे. यावर्षी कमी पडलेला पाऊस व भविष्यात उद्भवणारी पाण्याची समस्या यावर उपाययोजना करावी असे ग्रामपंचायतीने ठरवले होते़ शासनाच्या आवाहनानुसार त्यांनी गांधी जयंतीच्या निमित्ताने १ बंधारा बांधला़ मात्र, ग्रामस्थांचा उत्साह पाहून त्याच दिवशी सर्वानुमते एकाच दिवशी १० विजय बंधारे बांधायचे ठरवण्यात आले व त्याप्रमाणे नियोजनही करण्यात आले. नायशी गावातून जाणाऱ्या नदीवर ३०० ते ४०० मीटर अंतरावर एकाचवेळी दहा बंधारे बांधून चिपळूण तालुक्यात एकाचवेळी १० बंधारे बांधण्याचा विक्रम केला आहे. चिपळूणचे प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांनी प्रत्यक्ष वनराई बंधारे पाहण्यासाठी नायशी गावाला भेट दिली. त्याठिकाणी झालेले काम पाहून ते भारावून गेले़ याबद्दल सरपंच किशोर घाग व सदस्य तसेच नायशी ग्रामस्थांंना धन्यवाद दिले़ त्याचप्रमाणे नायशी गावाला विकासात्मक कामांच्या दृष्टीकोनातून सर्व सहकार्य करण्याचे अभिवचनही दिले़ त्यांच्यासमवेत गटविकास अधिकारी शुभांगी पाटील, उपगटविकास अधिकारी भोसले, कृषी अधिकारी खरात, चव्हाण, शेंडगे, तलाठी नितीन धुरी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. बंधारे बांधकामावेळी दुपारच्या स्नेहभोजनाचे आयोजनही करण्यात आले होते़ यामध्ये प्रांताधिकारी हजारे व गटविकास अधिकारी पाटील व इतर अधिकारी सहभागी झाल्याने ग्रामस्थांचा आनंद द्विगुणीत झाला़ या सर्व बंधाऱ्यांतील पाण्याचे नियोजन व वापर योग्य पध्दतीने केला जाणार आहे़ यामुळे परिसरातील आजूबाजूच्या विहिरींमधील पाण्याच्या पातळीतही वाढ होईल़ (प्रतिनिधी)पाणीटंचाईवर मात करण्यासाठी बंधारे बांधण्याचा उपक्रम.ग्रामस्थांचा उत्साह पाहून एकाच दिवशी बांधले बंधारे.प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांनी दिली गावाला भेट़बंधाऱ्यांमुळे विहिरींमधील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत.स्नेहभोजनाचाही घेतला आस्वाद.