शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

कोरोनाला वाकुल्या दाखवत उडाला दोन हजार ५०० लग्नांचा बार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 11:37 PM

आदेशाचा गैरफायदा घेत मोडले नियम

निखिल म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग: कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन करण्यात आले होते; परंतु कोरोना जसाजसा कमी होऊ लागला तसतशी टाळेबंदी शिथिल करण्यात आली होती. लग्नसमारंभाला मंजुरी देण्यात आली. ५० लोकांच्या आतच लग्न समारंभ करा, असे आदेश शासन, प्रशासनाने दिले; परंतु या आदेशाचा गैरफायदा घेत लग्नाचा बारच फुटला. सुरुवातीला काहींनी परवानगी घेतली; मात्र आता ५०० ते ८०० लोकांच्या गर्दीत लग्न समारंभ केले गेले.सध्या लग्नाचे मुहूर्त असल्याने दररोज लग्न समारंभ उरकण्यात आले. ना तिथी, ना कोरोनाची भीती यात लग्न समारंभ झाल्याने यातूनच कोरोनाचा उद्रेक झाला. जिल्ह्यातील गावांपैकी असा एकही गाव शिल्लक नाही ज्या गावात या वर्षभरात लग्न झाले नसेल. जोमाने लग्न समारंभ पार पाडण्यात आले. डिजे, ढोल यांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करीत लग्न करण्यात आले.जिल्ह्याच्या पंधरा तालुक्यात प्रत्येक तालुक्यात एकही दिवस नाही की लग्न झाली नाहीत. त्यामुळे लग्न समारंभातून कोरोनाचा उद्रेक होऊ लागला. परिणामी, आज कोरोनाने उग्र रूप धारण केले आहे. त्यामुळे नागरिक आता कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. यामुळे  चिंता आणि भीती वाढली आहे.जिल्ह्यात झाली २१५ रजिस्टर लग्नकोरोनाच्या काळात कमी पैशात लग्न करणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे, तसेच जिल्ह्यातील २१५ नव दाम्पत्यांनी नोंदणी पद्धतीने लग्न केले आहे. कोरोनामुळे नगरिकांनी सध्या कमी खर्चात, कमी लोकांत लग्न करणे पसंत केले.

एप्रिल कठीणच गेल्या वर्षापासून यंदाच्या मार्च महिन्यापर्यंत झालेल्या लग्न समारंभामुळे कोरोनाचा उद्रेक झाला. ही परिस्थिती सावरणे आता एप्रिल महिन्यात कठीण झाले आहे. एप्रिल महिन्यात ४ तारखेपासूनच सरकारने कडक निर्बंध लावले. त्यानंतर १५ एप्रिलपासून संचारबंदी लावली, तरीही लोक लग्न समारंभ करीतच आहेत.

मंगल कार्यालयचालकांच्या प्रतिक्रियाकोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून लग्न समारंभात वऱ्हाड्यांची घालून दिलेली अट ही मंगल कार्यालयात लग्न करण्यासाठी कारणीभूत ठरली. कमी लोकांत लग्न करायचे असेल तर मंगल कार्यालयात का लग्न करावे, असे लोकांना वाटले. मंगल कार्यालयात थाटामाटाने लग्न न करता घरीच लग्न करण्यात आले, त्यामुळे लावलेली रक्कम निघाली नाही.- मंगेश कोर्लेकरकोरोनाच्या संसर्गामुळे दरवर्षीच्या तुलनेत अर्धे लग्न समारंभही आमच्याकडे झाले नाहीत. ५0 लोकांच्या आतच लग्न आटोपण्याचा सरकारचा आदेश असल्याने लोकांनी मंगल कार्यालयात लग्न करण्यापेक्षा घरीच लग्न करणे पसंत केले. त्यामुळे आमचा व्यवसाय बुडाला आहे.- राकेश थळे

टॅग्स :marriageलग्न