शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
4
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
5
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
6
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
9
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
10
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
11
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
13
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
14
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
15
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
16
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
17
Shyam Nath Goswami : Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
18
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
19
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
20
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमध्ये युतीमधील असंतोषाला यादीनंतर फुटले तोंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 06:36 IST

रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघामध्ये युतीविरोधात आघाडी अशा लढती पाहायला मिळणार आहेत.

- आविष्कार देसार्ईअलिबाग : रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघामध्ये युतीविरोधात आघाडी अशा लढती पाहायला मिळणार आहेत. शिवसेनेने अलिबाग, श्रीवर्धन, महाड, उरण आणि कर्जत या पाच विधानसभा मतदारसंघात, तर भाजपने पनवेल आणि पेण या दोन विधानसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर केले.शेकाप अलिबाग, पेण, पनवेल, उरण या मतदारसंघात आणि राष्ट्रवादी काँग्रेस श्रीवर्धन आणि कर्जतमध्ये लढणार आहे. काँग्रेस महाड, पेण आणि अलिबाग विधानसभा मतदारसंघात लढतीसाठी सज्ज झाली आहे. मात्र युतीतील इच्छुकांची संख्या अधिक असल्याने यादी जाहीर होताच असंतोषाला तोंड फुटले आहे.शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी झालेली आहे. त्यांच्या आघाडीचा फायदा हा फक्त महाड विधानसभेत काँग्रेसचे उमेदवार माणिक जगताप यांना होणार आहे. अलिबाग आणि पेण येथे काँग्रेस आणि शेकाप यांच्या मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत. अलिबाग विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे महेंद्र दळवी यांच्याविरोधात शेकापचे सुभाष पाटील यांची लढत होणार आहे. या ठिकाणी भाजपचे अ‍ॅड. महेश मोहिते हेही इच्छुक असल्यानेच त्यांनीही उमेदवारी अर्ज मंगळवारी प्रांताधिकारी कार्यालयातून घेतला आहे. त्या वेळी त्यांच्यासोबत भाजपचे तालुकाध्यक्ष हेमंत दांडेकर होते. त्यामुळे शिवसेना-भाजपच्या युतीला ग्रहण लागण्याची शक्यता असल्याने शिवसेनेचे दळवी यांची धाकधूक वाढली आहे.श्रीवर्धन मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांच्याविरोधात शिवसेनेचे विनोद घोसाळकर यांचा सामना रंगणार आहे. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेले अवधूत तटकरे यांना येथून संधी मिळेल, असा अंदाज होता. मात्र त्यांनी माघार घेतल्याचे दिसते. याच मतदारसंघामध्ये भाजपचे कृष्णा कोबनाक हेसुद्धा इच्छुक आहेत. त्याचप्रमाणे उरण मतदारसंघातून महेश बालदी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल के लाआहे. या जागा शिवसेनेच्या वाट्याला गेलेल्या आहेत. त्यामुळे अ‍ॅड. महेश मोहिते, महेश बालदी आणि कृष्णा कोबनाक नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे शिवसेनेच्या उमेदवारांचे लक्ष लागले आहे.महाड विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार भरत गोगावले यांचा सामना काँग्रेसचे माजी आमदार माणिक जगताप यांच्याशी होणार आहे. पेण विधानसभा मतदारसंघामध्ये शेकापचे आमदार धैर्यशील पाटील यांची लढत भाजपचे उमेदवार रवींद्र पाटील यांच्यासोबत होणार आहे.पनवेलमध्ये भाजपचे प्रशांत ठाकूर यांच्या विरोधात शेकापचे उमेदवार हरिश केणी यांच्यात लढत होणार आहे. उरणमधून शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्याविरोधात शिवसेनेचे मनोहर भोईर यांच्यात चांगलीच लढत होणे अपेक्षित आहे.कर्जत विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुरेश लाड यांनी माघार घेतल्याने कोणता उमेदवार द्यायचा याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अद्याप ठरलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश ठाकरे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराची लढत ही शिवसेनेच्या महेंद्र थोरवे यांच्याशी होणार आहे. उमेदवारी अर्ज ४ आॅक्टोबरपर्यंत दाखल करण्याची मुदत आहे. त्यामुळे दोन दिवसांत कोणता उमेदवार अर्ज दाखल करतो हे स्पष्ट होणार आहे.नाराजीचे आव्हानदरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-भाजप यांची युती होण्याबाबत स्पष्ट झाले नव्हते, त्यामुळे भाजपच्या काही इच्छुकांनी जोरदार तयारी केली होती. त्यामुळे त्यांची नाराजी शिवसेना कशी पचवणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019