शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
3
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
4
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
5
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
6
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
7
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
8
Top Marathi News LIVE Updates: १ मेपासून मराठीची मोहीम सुरूच राहणार; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
9
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
10
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
11
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
12
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
13
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
14
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
15
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
16
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
17
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
18
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
19
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
20
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शिरवली ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्यांचे अपील आयुक्तांनी फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 03:05 IST

ग्रामस्थांच्या सार्वजनिक जमिनीवर अतिक्र मण करून घर बांधणे तसेच विक्र ी करणे, हे प्रकार केल्याचे सिद्ध झाले

अलिबाग - ग्रामस्थांच्या सार्वजनिक जमिनीवर अतिक्र मण करून घर बांधणे तसेच विक्र ी करणे, हे प्रकार केल्याचे सिद्ध झाल्याने अलिबाग तालुक्यातील शिरवली ग्रामपंचायतीचे सरंपच आणि सदस्यांचे अपील कोकण आयुक्तांनी फेटाळले आहे, त्याचप्रमाणे सरपंच आणि सदस्य पदावर राहण्यासही अपात्र ठरवल्याने शेकापला चांगलाच झटका बसल्याचे बोलले जाते. या अपील प्रकरणातील अर्जदार शिरवली येथील ग्रामस्थ श्याम श्रीधर घरत, मनोज गोपाळ म्हात्रे यांनी आयुक्तांचा आदेश रायगडचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केला आहे. अपात्र सरपंच आणि सदस्यांची पदे तत्काळ रिक्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे.शिरवलीचे सरपंच प्रमोद तुकाराम ठाकूर, ग्रामपंचायत सदस्या प्रीती प्रमोद ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य मदन कृष्णा म्हात्रे यांना रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी जानेवारी २०१९ मध्ये अपात्र ठरविले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावर कोकण विभाग आयुक्तांकडे सरपंचांसह अन्य सदस्यांनी अपील केले होते. त्यावर ७ आॅगस्ट रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान कोकण आयुक्तांनी अपील फेटाळले आहे. जिल्हाधिकरी रायगड यांचे आदेश कायम ठेवले आहेत.सरपंच प्रमोद ठाकूर हे आॅक्टोबर २०१७ मध्ये थेट सरपंच म्हणून शेकापकडून निवडून आले होते. सरपंच प्रमोद ठाकूर यांनी ग्रामस्थांच्या सार्वजनिक मालकीच्या जमिनीमध्ये बेकायदा घर बांधून त्याची विक्र ी केल्याने त्यांना तहसीलदार कार्यालयाकडून नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या, तसेच दंडही आकारण्यात आला असल्याने त्यांना अपात्र ठरविण्याची मागणी अर्जदारांनी केली होती. विवाद अर्जावर दोन्ही बाजूने युक्तिवाद झाले. ठाकूर यांनी सरकारी जमिनीवर, सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्र मण केल्याचे सिद्ध झाले.सुनावणीत मुंबई ग्रामपंचायत अधिनियमानुसार तसेच कुटुंबातील सदस्यांनी केलेले अनधिकृत बांधकामही ग्रामपंचायत सदस्य किंवा नगरसेवकांचे पद रद्द करावे, या सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकेमधील आदेशाचे पालन करून जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी अर्जदार श्याम घरत आणि मनोज म्हात्रे यांचा विवाद अर्ज मान्य केला होता.निर्णयावर शिक्कामोर्तबशिरवली ग्रामपंचायतीचे सरंपच प्रमोद तुकाराम ठाकूर, ग्रामपंचायत सदस्या प्रीती प्रमोद ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य मदन कृष्णा म्हात्रे यांना उर्वरित कालावधीसाठी अपात्र घोषित केले होते. आता आयुक्तांनी जिल्हाधिकारी यांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतRaigadरायगड