शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

झाकणाअभावी गटारात जनावरे पडण्याच्या घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 1:07 AM

नगरपरिषद हद्दीत मागील काळात रस्त्याच्या दुतर्फा सिमेंट क्राँक्रीटची मोठी गटारे बांधण्यात आली.

कर्जत : नगरपरिषद हद्दीत मागील काळात रस्त्याच्या दुतर्फा सिमेंट क्राँक्रीटची मोठी गटारे बांधण्यात आली. मात्र, यापैकी काही गटारांवर झाकणे बसविण्यात आलेली नसल्याने या उघड्या गटारात जनावरे तसेच लहान मुले पडण्याच्या घटना घडत आहेत.शहरातील मुद्रे येथील गुलमोहर रेस्ट हाउस परिसरात अशीच गटारे आहेत. या गटाराच्या दोन्ही बाजूने भरपूर गवत उगवले आहे. त्यामुळे या वाढलेल्या गवतात गटार दिसेनासे झाले आहे. त्यामुळे हे गवत चरण्यासाठी आलेल्या गाईला गटार दिसले नसल्याने ती चरता चरता गटारात पडली. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ही गाय बहुधा दोन दिवसांपासून या गटारात पडली असावी. गटार खोल असल्याने तसेच आजूबाजूला वाढलेल्या गवतामुळे कोणाला कळले नसावे. सुदैवाने ही बाब उशिराने का होईना स्थानिक रहिवाशांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ नगरसेवक नितीन सावंत यांना सांगितले. त्यांनी आपत्ती विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांच्या आणि अन्य लोकांच्या साह्याने गटारात पडलेल्या गाईला सुखरूप बाहेर काढले.शहरात गटारात जनावरे पडण्याच्या घटना यापूर्वीही अनेक वेळा घडल्या आहेत, तेंव्हा मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी गटारे बंदिस्त करण्यात येतील, असे सांगितले होते. मात्र, त्यानंतर काही गटारे बंदिस्त झाली, झाकणे बसविली. मात्र, अद्यापही उघडी आहेत.>काही भागातील गटारे उघडी असल्याने जनावरे तसेच लहान मुले पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. काही दिवसांपूर्वी अशीच एक म्हैस गटारात पडून तिचा मृत्यू झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. तरी नगरपरिषद प्रशासनाने त्वरित अशी उघडी गटारे बंदिस्त करावी, जेणेकरून अशा दुर्घटना घडणार नाहीत.- प्रमोद खराडे, मुद्रे