शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्त बंगल्याच्या परिसराच्या सुशोभीकरणाला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 00:49 IST

पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : महानगरपालिकेची स्थायी समिती सभा सोमवारी संपन्न झाली. या बैठकीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये उद्योग व्यवसायांना परवाने वाटपाबाबत चर्चा करण्यात आली.

पालिका क्षेत्रातील खारघर नोडमधील प्लॉट क्र.२२ सेक्टर नं.५ येथील आयुक्त निवासस्थानाबाहेरील परिसर विकसित करणे व परिसरात लँडस्केपिंग करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर, पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नव्याने बांधण्यात आलेले १२ सार्वजनिक शौचालय पे अँड यूज तत्त्वावर देण्याबाबतही बैठकीत मंजुरी देण्यात आली.

 यावेळी बैठकीदरम्यान परवाना विभागाकडील व्यवसाय परवाने, हॉटेल व्यवसाय परवाने, नवीन कारखाने व उद्योगधंदे यांचे सर्वेक्षण, नोंदणीकरण, नूतनीकरण, दुकानावरील जाहिराती व परवाना संबंधीची अनुषंगिक कामे स्वारस्य अभिव्यक्ती पद्धतीने करून नवीन व्यवसाय परवाने देणे व नूतनीकरण याबाबतही चर्चा करण्यात आली.  पुढील सभेत त्याविषयी निर्णय घेतला जाईल, तसेच महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग समिती ब, प्रभाग क्र. ७ मधील रोडपाली स्मशानभूमी दुरुस्ती करणे, पालिका क्षेत्रातील जाहिरात धोरणेच्या कामी मे.अलवेज ॲडव्हटायझिंग एजन्सी वाशी, नवी मुंबई यांना मुदतवाढ देण्यास मान्यता मिळण्याबाबतही चर्चा करण्यात आली.पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील १ भूस्तर साठवण टाकी व १८ जलकुंभांची दुरुस्ती करण्याबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी स्थायी समिती सभापती नगरसेवक संतोष शेट्टी, सभागृह नेते परेश ठाकूर, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, महिला बालकल्याण समिती अध्यक्ष मोनिका महानवर यांच्यासह स्थायी समिती सदस्य, महापालिकेचे उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त संजय शिंदे, सहायक आयुक्त धैर्यशील जाधव, इतर अधिकारी उपस्थित होते. 

डॉ. नानासाहेब यांना श्रद्धांजलीमहाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांची जयंती १ मार्च  रोजी पालिकेमार्फत जयंती साजरी केली नसल्याने पालिका प्रशासन व सत्ताधाऱ्यांना नानासाहेबांचा विसर पडल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी स्थायी समितीत केला.