महिलेच्या खूनप्रकरणी तरुणाला अटक

By Admin | Updated: August 3, 2015 04:05 IST2015-08-03T04:05:25+5:302015-08-03T04:05:25+5:30

चहाची टपरी चालवणाऱ्या महिलेचा अज्ञात लोकांनी खून करून तिचा मृतदेह फरफटत नेऊन जवळच्या खड्ड्यामध्ये टाकून दिल्याप्रकरणी भारती

The youth was arrested on the murder of a woman | महिलेच्या खूनप्रकरणी तरुणाला अटक

महिलेच्या खूनप्रकरणी तरुणाला अटक

पुणे : चहाची टपरी चालवणाऱ्या महिलेचा अज्ञात लोकांनी खून करून तिचा मृतदेह फरफटत नेऊन जवळच्या खड्ड्यामध्ये टाकून दिल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली होती. खून झालेल्या महिलेवर आरोपीने बलात्कार केल्याचेही तपासादरम्यान निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
भाग्यश्री हनुमंत नाटेकर (वय ४५, रा. ओंकार ग्रुप कंपनीजवळ, आंबेगाव खुर्द) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. जीवन अंकुश भोंडवे (वय २५, रा. जांभुळवाडी) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी लक्ष्मी शिवाजी शिंदे (वय ४०, रा. वडगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाटेकर या मूळच्या कर्नाटकमधील हावळगी येथील रहिवासी आहेत. त्यांच्या पतीचे निधन झालेले आहे. दोन वर्षांपासून जांभुळवाडी रस्त्यावर सुरू असलेल्या फॅन्टसी कन्स्ट्रक्शनशेजारी नाटेकर पत्र्याच्या टपरीमध्ये चहाविक्रीचा व्यवसाय करीत होत्या.
पोलीस कर्मचारी प्रकाश मोरे यांना आरोपी भोंडवे याच्याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले.

Web Title: The youth was arrested on the murder of a woman