पुणे : कात्रज घाटात टेम्पोच्या धडकेत पादचारी तरुण मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. अपघातानंतर पसार झालेल्या टेम्पो चालकाविरुद्ध आंबेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अक्षय सरोदे (३०, रा. भिलारेवाडी, कात्रज) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचारी तरुणाचे नाव आहे. याबाबत रेश्मा पवळ (३२, रा. कात्रज) यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास कात्रज घाटातील त्रिमूर्ती हाॅटेलसमोरून रस्ता ओलांडत होता. त्यावेळी कात्रजकडून स्वारगेटकडे भरधाव वेगात निघालेल्या टेम्पोने अक्षयला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या अक्षयला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली. पसार झालेल्या टेम्पो चालकाचा शोध घेण्यात येत असून, पोलिस उपनिरीक्षक नितीराज थोरात तपास करीत आहेत.
Web Summary : A young man, Akshay Sarode, died in Katraj Ghat after being hit by a speeding tempo while crossing the road. Police are searching for the driver who fled the scene after the accident. A case has been registered.
Web Summary : कात्रज घाट में सड़क पार करते समय तेज रफ्तार टेम्पो की टक्कर से अक्षय सरोदे नामक एक युवक की मौत हो गई। दुर्घटना के बाद भाग रहे ड्राइवर की पुलिस तलाश कर रही है। मामला दर्ज कर लिया गया है।