शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

प्रॉपर्टीच्या वादातून तरूणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2019 11:36 AM

अधिक तपास पोलीस निरीक्षक रविंद्र कदम करीत आहेत.

पुणे : विकसनासाठी दिलेल्या सामूहिक जागेतील व्यवहार मान्य नसल्याने झालेल्या वादातून चुलत भावानेच भावाचा दगडाने  ठेचून खून केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी रात्री विश्रांतवाडीत घडला. विवेक बाळासाहेब पंचमुख (वय ३०, रा. जनार्दननगर,  लोहगाव) असे या घटनेत खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी पोलिसांनी आनंद नामदेव पंचमुख (वय ३२, रा. शांतीनगर, विश्रांतवाडी) व त्याच्या साथीदारांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.पोलीस निरीक्षक अरूण आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या आळंदी रस्त्यावर 'एसआरएस्किम'समोर रविवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास एक जण गंभीर जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती विश्रांतवाडी पोलिसांना मिळाली होती. पोलिस निरीक्षक रविंद्र कदम व पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहिले असता एक जण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्याला तात्काळ उपचारासाठी ससून रूग्णालयात पाठवण्यात आले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, विवेक पंचमुख याने  त्याचे गावी रांजणगाव येथील २०१४ मध्ये  भावकीचे  सामाईक क्षेत्र सर्वांच्या संमतीने  विकसनासाठी दिले होते. त्याची नोंद रांजणगाव तलाठी कार्यालयात झाली आहे. मात्र अद्याप काम सुरू न झाल्यामुळे भावकीतील चुलत भाऊ आनंद पंचमुख हा विरोध करत होता. या व्यवहारातील विरोधातून त्याने  विवेक याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. रविवारी संध्याकाळी सहा वाजता आनंद याने विवेक याला शांतीनगर येथे बोलावले. याच विषयावरून झालेल्या वादातून आनंद याने साथीदारांच्या मदतीने विवेक याचा लोखंडी रॉड व दगडाने ठेचून निर्घृण खून केला. या प्रकारानंतर हल्लेखोर पळून गेले आहेत.

घटनास्थळी पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू, सहाय्यक पोलिस आयुक्त मच्छिंद्र बोराटे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अंजुम बागवान यांनी भेटी देऊन तपासाच्या सूचना दिल्या. विवेक हा जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करीत असे. येरवडा व लोहगाव परिसरात सामाजिक उपक्रमात तो नेहमी सहभागी होता. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे. या निर्घृण खुनाच्या घटनेमुळे विश्रांतवाडी परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. विश्रांतवाडी सह गुन्हे  शाखेची पथके आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आली आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक रविंद्र कदम करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे