शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: छातीत लाथा घातल्यानं तरुणाचा मृत्यू; लोणी काळभोर मधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 13:07 IST

 टेम्पो आणि दुचाकीच्या किरकोळ अपघातात वाद झाला

ठळक मुद्देटेम्पो चालक पळून जाण्याच्या बेतात असताना तिघांनी ठेवलं पकडून

लोणी काळभोर : टेम्पो आणि दुचाकीच्या किरकोळ अपघातात वाद झाल्यानं टेम्पो चालकाने दुचाकीस्वाराच्या छातीत लाथा घातल्यानं मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना थेऊर येथे घडली आहे. सुंदर शिवा पवार ( वय २४, रा. आलिफनगर ) असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. 

 याप्रकरणी त्यांचा भाऊ विठ्ठल शिवा पवार ( वय ३५ ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टेम्पो चालक आदित्य सुधीर  धाराशिवकर ( वय २३ रा. कामधेनु इस्टेट, मंत्री मार्केट समोर, हडपसर ) याला अटक करण्यात आली आहे. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सुंदर आणि त्याचे दोन मित्र दुचाकीवरून थेऊरच्या दिशेनं जात होते.  त्याठिकाणी एका मिसळ हॉटेलच्या समोरून थेऊरच्या दिशेनं जाणाऱ्या टेम्पोचा सुंदरच्या दुचाकीला कट लागून किरकोळ अपघात झाला. 

सुंदरने टेम्पो चालकास विचारणा केली असता दोघांत वादावादी सुरु झाली. त्यानंतर टेम्पो चालक धाराशिवकर यानं सुंदरच्या छातीत ४ ते ५ लाथा मारल्या. त्यामुळे तो जमिनीवर बेशुध्द होऊन पडला. त्यावेळी धाराशिवकर हा पळून जाण्याच्या बेतात असताना सुंदरच्या सोबत असणाऱ्या दोन मित्रांनी आणि त्याठिकाणी हजार असणाऱ्या एका व्यक्तीनं टेम्पो चालकांस पकडून ठेवले.

सदर घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी सुंदर यांस टेम्पोमध्ये घालून तात्काळ थेऊर गावातील डॉ सैय्यद यांच्याकडे नेले. तो अत्यावस्थ असल्यानं त्यांनी मोठया हॉस्पिटल मध्ये त्यास हलविण्यास सांगितले. त्यामुळे सुंदरला लोणी स्टेशन येथील विश्वराज हॉस्पिटल येथे नेले असता डॉक्टरांनी तपासणी करून तो उपचारापुर्वीच मृत्यू झाल्याचं घोषित केले.

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक