शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
5
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
6
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
7
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
8
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
9
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
10
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
11
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
12
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
13
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
14
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
15
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
16
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
18
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
19
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
20
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

महिलेचा खून करून तरुणाची आत्महत्या, दिघीतील लॉजवर घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 20:43 IST

पिंपरी: दिघी येथील एका लॉजमध्ये तरुणाने महिलेचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघांचे मृतदेह नग्नावस्थेत ...

पिंपरी: दिघी येथील एका लॉजमध्ये तरुणाने महिलेचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघांचे मृतदेह नग्नावस्थेत आढळले. हा प्रकार गुरूवारी सकाळी दहा वाजताउघडकीस आला. प्रकाश महादेव ठोसर (वय २८, रा. अजंठानगर, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. तर, ३५ वर्षीय महिलेचा खून झाला आहे. दिघी ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी याबाबत माहिती दिली. प्रकाश अविवाहित असून महिला विवाहित होती. तिला एक मुलगा एक मुलगी आहे.

विवाहितेचा पती एका खुन प्रकरणात चार वर्षापासून कारागृहात आहे. प्रकाशसोबत तिचे गेल्या दोन वर्षापासून प्रेमसंबंध होते. दोघे नेहमी दिघीतील अथर्व लॉजवर जात असत. बुधवारी (दि. २४) दुपारी तीन वाजता दोघे लॉजवर आले होते. खोलीत दोघात कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. त्यात प्रकाशने महिलेचा गळा दाबून खून केला. त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली.

गुरुवारी सकाळी दहा वाजता ते लॉज सोडणार होते. मात्र, त्यांनी लॉज सोडला नाही. त्यामुळे लॉजचे व्यवस्थापक बाळू नवसागर यांनी बाहेरून आवाज दिला. मात्र, आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पोलिसांना माहिती देत दरवाजा उघडला असता ही घटना उघडकीस आली. महिला बेडवर मृतावस्थेत पडली होती. तर, प्रकाश छताच्या फॅनला साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. दोघेही नग्नावस्थेत होते.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड