शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

एचए, फोर्स मोटर्सच्या कामगारांचे साकडे

By admin | Updated: September 25, 2015 01:01 IST

विविध प्रलंबित मागण्यांसाठी येथील हिंदुस्थान अ‍ॅन्टिबॉयोटिक्स (एचए) आणि आकुर्डीतील फोर्स मोटर्स कंपनीच्या कामगारांचे वेगवेगळे आंदोलन सुरू आहे.

पिंपरी : विविध प्रलंबित मागण्यांसाठी येथील हिंदुस्थान अ‍ॅन्टिबॉयोटिक्स (एचए) आणि आकुर्डीतील फोर्स मोटर्स कंपनीच्या कामगारांचे वेगवेगळे आंदोलन सुरू आहे. मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी कामगारांनी गणरायाला साकडे घातले आहे. एचए कामगारांनी गणरायाचे पाचव्या दिवशी विसर्जन केले नाही, तर फोर्स मोटर्सच्या चारपैकी दोन महिला अस्वस्थ असून, दोघींनी कामगारांच्या आग्रहाखातर उपोषण सोडले आहे. शहरात एकीकडे आनंदोत्सव, दुसरीकडे हक्कासाठी झगडणारा कामगार असा विरोधाभास जाणवत आहे.एचए कंपनीच्या कामगार आणि व्यवस्थापनातर्फे कॉलनीत ६० वर्षांपासून गणेशोत्सव साजरा केला जातो. कामगारांचे १३ महिन्यांचे वेतन प्रलंबित आहे. तसेच, दोन वर्षांपासून कंपनी पुनवर्सनाचा प्रस्ताव पडून आहे. उत्पादन ठप्प आहे. पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू करावे, आदी मागण्यांसाठी कामगारांचे आंदोलन सुरू आहे. सध्या ते स्थगित केले होते. हा प्रश्न सोडविण्यासाठी कामगारांनी थेट गणरायाला साकडे घातले आहे. ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत गणेशाचे विसर्जन करणार नाही, असा इशारा कामगारांनी दिला आहे. कामगार दर वर्षी पाच दिवसांचा गणेशोत्सव साजरा करतात. मात्र, अद्याप कोणतेही आश्वासन न मिळाल्याने गणेशाचे विसर्जन केले गेले नाही. याच ठिकाणी नवरात्रोत्सव (दुर्गोत्सव) साजरा केला जातो. त्या काळातही या प्रकारचे आंदोलन छेडले जाणार असल्याचे कामगारांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. या प्रश्नी तोडगा निघावा, अशी विनवणी कामगार आणि त्यांचे कुटुंबीय करीत आहेत. दुसरीकडे फोर्स मोटर्स कंपनीचे कामगार कुटुंबीयांतील ६ महिला १ तारखेपासून आमरण उपोषणास बसल्या आहेत. वाकडेवाडी येथील कामगार उपायुक्त कार्यालयाच्या आवारात हे आंदोलन सुरू आहे. कामगार मंत्री, पालकमंत्री, खासदार आदींनी आश्वासन देऊनही आंदोलन कायम आहे. मंगळवारी २२ व्या दिवशी प्रकृती बिघडल्याने रेखा जगताप व उषा काळे यांना अतिदक्षता विभागात दाखल केले. डॉक्टरांनी त्याचे उपोषण सोडण्याची विनंती केली. कामगारांची आग्रही विनंती लक्षात घेऊन उपोषण सोडले. मात्र, उर्वरित चौघांपैकी दोघींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. योग्य तोडगा निघून आंदोलन संपावे, अशी कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी गणरायाला साकडे घातले आहे. (प्रतिनिधी)