शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनीचे काम रासे ग्रामस्थांनी पाडले बंद

By admin | Updated: July 4, 2014 06:42 IST

भामा आसखेड धरणावरून पुणे शहराला जाणाऱ्या जलवाहिनीला होणारा विरोध तीव्र होत आहे.

चाकण/ आंबेठाण : भामा आसखेड धरणावरून पुणे शहराला जाणाऱ्या जलवाहिनीला होणारा विरोध तीव्र होत आहे. बुधवारी रासे गावातील नागरिकांनी हे काम बंद पाडले असून गावोगावत या संदर्भात बैठका होत असून विरोध वाढत आहे. शेतकरी येत्या ८ जुलैला खेडच्या तहसीलदार कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चाची तयारी सुरु आहे. भीषण पाणीटंचाई असलेल्या गावांतून भामा आसखेड धरणाचा उजवा कालवा जात असून, त्यासाठी संपादित करण्यात आलेली जमीन हस्तांतरित करण्यात आली आहे. मात्र, अद्याप कालव्याचे काम सुरू करण्यात आले नाही. असे असताना पुणेकरांसाठी बंद जलवाहिनीचे काम जलद होत आहे. यामुळे येथील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. त्यांनी रासे येथे सुरू असलेले काम बंद पाडले. या वेळी रमेश शिंदे, तुकाराम चौधरी, सुरेश सुतार, गुलाब शिंदे, सूर्यकांत मुंगसे, नामदेव मुंगसे, अनिकेत केदारी, राजू केदारी, हनुमंत डावरे, बाळासाहेब डावरे, कृष्णाबाई दाभाडे, बाळासाहेब वाडेकर, शांताराम डावरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.दरम्यान या प्रश्नाबाबत गावोगावी बैठका सुरू करण्यात आल्या आहेत. याबाबतची बैठक नुकतीच कोरेगाव (ता. खेड) येथे घेण्यात आली. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टे-पाटील म्हणाले, ‘‘भामा-आसखेड धरणाचा मूळ हेतू बाजूला ठेवून शासन भांडवलदारासाठी पाण्याचा उपयोग करीत आहे. प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातून अडविण्यात आलेल्या पाण्याचा उपयोग शेतकरी वर्गाऐवजी कारखानदार आणि शहरी भागासाठी शासन करीत आहे. यामुळे शेतकरी चिडला असून, त्याचे परिणाम राज्यकर्त्यांना भोगावे लागतील.’’बैठकीला पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष अमोल पवार, पंचायत समिती सदस्य सोमनाथ दौंडकर, माजी पंचायत समिती सदस्य रोहिदास गडदे, माजी युवक अध्यक्ष चांगदेव शिवेकर, मोईचे उपसरपंच पाटील गवारी, सुनील देवकर, अमोल पानमंद, आनंदराव कोळेकर, सत्यवान नवले, किसन पिंजण, नवनाथ काळे, काळूराम पिंजण, कैलास लिंभोरे, शिवाजी डावरे-पाटील, नंदू निखाडे, सयाजी कोळेकर, प्रदीप नवरे, आनंदा आवरी, दत्तात्रय मांडेकर, रवींद्र गाढवे, गणेश बोत्रे, संभाजी निखाडे, गोविंद घाटे, शिवाजी डावरे-पाटील यांच्यासह प्रकल्पग्रस्त व लाभक्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)