शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकाच्या मोबाईलवरून पाठवला मेसेज अन् ‘ती’’ची झाली कुंटणखान्यातून सुटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 13:00 IST

नोकरी देण्याच्या आमिषाने एकाने तिला पुण्यात आणले आणि देहविक्रय करण्याच्या व्यवसायात ढकलून दिले.

ठळक मुद्देन्यायालयाने दिला पीडित महिलेचा तिच्या मुलाकडे ताबा

पुणे : 'ती' मूळची पश्चिम बंगालची. एका व्यक्तीने पुण्यात नोकरी देतो असे आमिष दाखवून बुधवार पेठेमध्ये सोडून तिला देहविक्रय करण्यास भाग पाडले. 2018 सालची ही घटना. एक वर्षानंतर एका ग्राहकामार्फत तिने आपल्या मुलाला मेसेज केला आणि पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर अखेर त्या अंधाऱ्या कोठडीमध्ये आयुष्य जगणाऱ्या 'ती'ची सुटका झाली. न्यायालयाने या पीडित महिलेचा ताबा तिच्या मुलाकडे देण्याचा आदेश दिला.

45 वर्षीय महिला दोन मुलांची आई आहे. नोकरी देण्याच्या आमिषाने एकाने तिला पुण्यात आणले आणि देहविक्रय करण्याच्या व्यवसायात ढकलून दिले.तिच्या एका ग्राहकाला तिने  दु:ख सांगितले आणि त्यानेही माणुसकीच्या नात्याने तिच्या मुलाला मेसेज पाठविण्यास सहकार्य केले. हे प्रकरण पोलिसांकडे गेल्यानंतर तिच्यासह एका महिलेची सुटका झाली. फरासखाना पोलीस ठाण्यात सप्टेंबर 2020 मध्ये संबंधित व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

डिसेंबरमध्ये मुलगा पुण्यात आला आणि त्याने वकिलांमार्फत न्यायालयात आईच्या ताब्याकरिता न्यायालयात अर्ज केला. त्यानंतर अ‍ॅड. पुष्कर दुर्गे आणि अ‍ॅड. तेजलक्ष्मी धोपावकर यांनी महिलेचा मुलगा तिची काळजी घेईल व परत ती अशा घटनेची बळी होणार नाही. याची खबरदारी घेईल. तसेच पीडित महिला न्यायालयात गरज पडेल तेव्हा साक्ष देण्यासाठी हजर राहील असे सांगून न्यायालयात पीडित महिला व मुलाची बाजू मांडली. मात्र पीडित महिला व तिचा मुलगा यांचे ओळखपत्र व इतर कागदपत्रे बंगाली भाषेत असल्याने, न्यायालयीन प्रक्रियेत अडसर निर्माण झाला. परंतु वकिलांनी दोघांची एलआयसी पॉलिसी न्यायालयात दाखल केली. ज्यामध्ये इंग्रजी भाषेत दोघांच्या नात्याबददल लिखित पुरावा होता असे अ‍ॅड. धोपावकर यांनी सांगितले. त्यानंतर न्यायालयाने सोमवारी(दि.2) पीडित महिलेचा ताबा तिच्या मुलाकडे देण्याचा आदेश दिला.-------------------------------------------------------------------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेProstitutionवेश्याव्यवसायPoliceपोलिसWomenमहिला