पत्नीचा गळा दाबून खून; पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने गोठ्यातील पाईपला लटकवले, जुन्नर तालुक्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 17:06 IST2026-05-18T17:05:38+5:302026-05-18T17:06:21+5:30

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत झालेल्या वादातून ही घटना घडली असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे

Wife strangled to death; Hanging from a pipe in the cowshed to destroy evidence, shocking incident in Junnar taluka | पत्नीचा गळा दाबून खून; पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने गोठ्यातील पाईपला लटकवले, जुन्नर तालुक्यातील धक्कादायक घटना

पत्नीचा गळा दाबून खून; पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने गोठ्यातील पाईपला लटकवले, जुन्नर तालुक्यातील धक्कादायक घटना

सावरगाव : जुन्नर तालुक्यातील निमगाव तर्फे म्हाळुंगे येथे एका विवाहित महिलेचा गळा दाबून खून करून तो आत्महत्येच्या बनावाचे स्वरूप दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून, जुन्नर पोलिसांनी पतीविरुद्ध खुनाचा गंभीर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.

जुन्नर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, रूपाली नवनाथ पारखे (वय ३५, रा. निमगाव तर्फे म्हाळुंगे, ता. जुन्नर, जि. पुणे) यांचा संशयास्पद मृत्यू शुक्रवारी (दि. १६) दुपारी सुमारे १:३० वाजण्याच्या सुमारास घडला. या घटनेप्रकरणी मयत महिलेचे भाऊ विकास वसंत पवार (रा. बल्लाळवाडी) यांनी जुन्नर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, रूपाली पारखे यांचे पती नवनाथ बाजीराव पारखे (वय ४३, रा. निमगाव तर्फे म्हाळुंगे) यांनी पत्नीला शेतातील गोठ्यात नेले. त्यानंतर तिचा दोन्ही हातांनी गळा दाबून खून केला. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने तिच्या गळ्याला दोरी बांधून गोठ्यातील लोखंडी पाईपला लटकविले आणि तिने गळफास लावून आत्महत्या केल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर निमगावात एकच खळबळ उडाली. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच जुन्नर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी जुन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत झालेल्या वादातून ही घटना घडली असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. फिर्याद नोंदविण्याची प्रक्रिया सहायक पोलिस निरीक्षक मोरे यांनी पूर्ण केली असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गटकूळ करीत आहेत.

Web Title : पत्नी का गला घोंटकर हत्या; जुन्नर में सबूत मिटाने के लिए लटकाया

Web Summary : जुन्नर में एक व्यक्ति ने अपनी पत्नी का गला घोंट दिया और सबूत मिटाने के लिए उसे गोशाला में पाइप से लटकाकर आत्महत्या का रूप देने की कोशिश की। पुलिस ने पति को गिरफ्तार कर लिया है, पत्नी के चरित्र पर विवाद का संदेह है। जांच जारी है।

Web Title : Wife Strangled, Hanged to Conceal Murder in Junnar, India

Web Summary : In Junnar, India, a man strangled his wife and staged a suicide by hanging her from a pipe in a cowshed to destroy evidence. Police arrested the husband, suspecting a dispute over the wife's character as the motive. An investigation is underway.