महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांची निवड होताच काटेवाडीत आनंदाला उधाण 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 09:01 PM2019-12-30T21:01:14+5:302019-12-30T21:06:34+5:30

गुलालाची उधळण , फटाक्याची आताषबाजी करत आनंदोत्सव  साजरा

When Ajit Pawar was elected as the Deputy Chief Minister of Maharashtra happiness in the Katewadi | महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांची निवड होताच काटेवाडीत आनंदाला उधाण 

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांची निवड होताच काटेवाडीत आनंदाला उधाण 

googlenewsNext
ठळक मुद्देयावेळी अजित दादा तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा घोषणासाखर, पेढे वाटून आनंद व्यक्त

काटेवाडी: महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांची निवड होताच त्याच्या काटेवाडी गावात अक्षरश: दिवाळी साजरी करत जल्लोष करण्यात आला. फटाक्याची आताषबाजी व जयघोषाच्या घोषणांनी काटेवाडी दुमदुमन गेली. महिलावर्गांनी गावात आबाळ वृध्दांसमवेत साखर, पेढे वाटून आनंद व्यक्त केला. 
उपमुख्यमंत्रीपदाची पवार यांनी शपथ घेताच गावातील तरुणाई संत तुकाराम महाराज पालखी औटा येथे मोठया सख्येने एकत्र आली . उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला. गुलालाची उधळण , फटाक्याची आताषबाजी करत आनंदोत्सव  साजरा केला . परिसरात अक्षरश: दिवाळी साजरी करण्यात आली.

राज्याच्या राजकारणावर पकड असलेला आपला नेता महाविकास आघाडी सरकारच्या उपमुख्यमंत्रीपदावर आरूढ झालयाने तरूणाई भारावुन गेली. दादा उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्याने तरुणाई नाचु लागली होती .पवार यांचेसह त्यांचे खंदे समर्थक इंदापुर तालुक्याचे आमदार दतात्रय भरणे यांचीही राज्य मंत्रीपदी निवड झाल्याने आनंद द्विगुणीत करण्यात आला. यावेळी संरपच विदयाधर काटे , सोसायटीचे माजी अध्यक्ष प्रकाश काटे मिलिंद काटे , शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष मारूती काटे , बापुराव गायकवाड , स्वप्निल काटे ,निखील काटे , कुमार कढणे , रोहित गायकवाड सह विविध संस्थाचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते ; . .अजित दादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच काटेवाडी परिसरातील कन्हेरी, पिंपळीलिमटेक , मासाळवाडी ढेकळवाडी खताळपटटा येथील युवकांनी मिठाईवाटून -फटाके फोडून आंनद साजरा केला  यावेळी अजित दादा तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा घोषणाा देण्यात आल्या
यावेळी  शुभम ठोंबरे,  राहुल कदम, दादासाहेब माने, शैलेश पवार, अजित झारगड, वैभव पवार व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: When Ajit Pawar was elected as the Deputy Chief Minister of Maharashtra happiness in the Katewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.