शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

बाधितांना नुकसानभरपाई मिळवून देऊ

By admin | Updated: September 25, 2015 01:08 IST

शहराच्या हद्दीमध्ये ‘हडपसर ते जेजुरी’ या राज्यमार्गाच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी १५ मीटर डांबरीकरण व ५ मीटर मोकळी जागा ठेवण्याचे प्रशासनाचे धोरण असून,

जेजुरी : शहराच्या हद्दीमध्ये ‘हडपसर ते जेजुरी’ या राज्यमार्गाच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी १५ मीटर डांबरीकरण व ५ मीटर मोकळी जागा ठेवण्याचे प्रशासनाचे धोरण असून, लवकरच हे काम सुरू होणार आहे. रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूला २० मीटर जागेमध्ये रुंदीकरण करताना, बाधित होणारी बांधकामे काढण्यासाठी नोटिसा बजाविण्यात येणार आहेत. रस्तारुंदीकरणात येणारी बांधकामे संबंधितांनी स्वखर्चाने काढावीत; अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ती काढून इमारतमालकांकडून खर्च वसूल केला जाईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी विजयकुमार ठुबे यांनी जेजुरीत ग्रामस्थांच्या बैठकीत सांगितले.या वेळी नागरिकांनी १५ मीटरचे रुंदीकरण अन्यायकारक असून, त्यामुळे अनेक जणांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजूला १२ मीटरचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी आग्रही मागणी केली. येथील घरांचे, दुकांनाचे कमीत कमी नुकसान होऊन नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील, असे आश्वासन ठुबे यांनी दिले. ‘हडपसर ते जेजुरी’ दरम्यान राज्यमार्ग चौपदरीकरण रस्तारुंदीकरणाबाबत जेजुरी नगर परिषद कार्यालयात गुरुवारी (दि.२४) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जेजुरीतील ग्रामस्थ व्यावसायिक, सर्वपक्षीय नगरसेवक, पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक रामदास शेळके, मुख्याधिकारी समीर भूमकर, नगराध्यक्षा ज्ञानेश्वरी बारभाई, उपाध्यक्ष संपत जगताप, ज्येष्ठ नेते दिलीप बारभाई यांच्यासह ग्रामस्थ, व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.माहिती देताना ठुबे म्हणाले की, ‘आळंदी ते पंढरपूर’ हा पालखी महामार्ग राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ घोषित झाला आहे. राज्यशासनाकडून हस्तांतरित झाल्यानंतर, या मार्गाचे काम सुरू होणार आहे. जेजुरी शहरातून जाणारा उड्डाणपूल रद्द करून, दोन्ही बाजूला प्रत्येकी १५ मीटर रुंदीकरण व ५ मीटर मोकळी जागा ठेवण्याचे शासनाचे धोरण आहे; मात्र रस्त्याचे मध्यापासून ३७ मीटर अंतरापर्यंत बांधकामांना नगरपालिकेने परवानगी देऊ नये, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. राज्यशासनाला ग्रामस्थांबाबत सहानुभूती असून, याबाबत पुन्हा बैठकीचे नियोजन करून शासनाकडे १२ मीटरचा प्रस्ताव देऊन विचारविनिमय करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.(वार्ताहर)