शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

“आम्ही या भागातील दादा असून, हप्ता न देणा-यांना खल्लास करून टाकू”

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 15:36 IST

कोयते हवेत फिरवून टोळक्याने माजवली दहशत

ठळक मुद्देआरोपींवर गुन्हा दाखल, पाच जण अटकेत

पिंपरी : आम्ही या भागातील दादा असून, आम्हाला हप्ता न देणा-यांना खल्लास करून टाकू, असे म्हणून टोळक्याने नासधूस करून वडापावच्या गाडीवरील गल्ल्यातील एक हजार १०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. कोयते व लाकडी दांडके हवेत फिरवून दहशत निर्माण केली. याप्रकरणी १४ आरोपींवर गुन्हा दाखल करून पाच जणंना अटक करण्यात आली. दत्तनगर, चिंचवड येथे शुक्रवारी (दि. १९) रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला.

अजय कांबळे, प्रदीप गोणे, सजनी सावंत, दत्ता देवकर, अजय थोरात, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह राहुल कांबळे, अभिजित गायकवाड, दादा शिंदे, काक्या शिंदे, सोन्या कांबळे, दशरथ पात्रे, मुकूल कांबळे, निहाल शेख, मोसिन शेख (सर्व रा. दत्तनगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. रंजना निवृत्ती शिंदे (वय ५५, रा. दत्तनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. २०) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या पतीसह दत्तनगर येथे त्यांच्या वडापावच्या गाडीवर थांबले होते. त्यावेळी आरोपी लाकडी दांडके व कोयत्यांसह तेथे आले. आम्ही या भागाचे दादा आहोत, तुम्ही आम्हाला द्यायचा व आता आम्हा सर्वांना वडापाव द्यायचा, असे आरोपी म्हणाले. तुम्ही खूप दिवसांपासून वडापावची गाडी लावून फुकटचे पैसे कमावताय, आम्हाला वडापाव व रोज एक हजार रुपये हप्ता द्यायचा, जर हप्ता दिला नाही तर तुम्ही येथे वडापावची गाडी लावायची नाही, असे आरोपी म्हणाले. आमचे हातावरचे पोट आहृ आम्ही दिवसभर राबतो व तुम्ही फुकट वडापाव खाऊन आमच्याकडे पैसे मागता काय, असे फिर्यादी व त्यांचे पती आरोपींना म्हणाले. त्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीच्या पतीला धक्काबुक्की केली. तसेच शिवीगाळ करून वडापावच्या गाडीवरील वडापाव घेतले. त्यानंतर वडापाव विक्रीचे झालेल्या धंद्याचे गल्ल्यामधील सुमारे एक हजार १०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

दहशतीमुळे दुकाने केली बंदआम्ही या भागातील दादा असून, जर आमचे कोणी ऐकले नाही व आम्हाला हप्ता दिला नाही तर आम्ही एकएकाला खल्लास करून टाकू, असे म्हणून आरोपींनी मोठमोठ्याने आरडाओरडा केला. वडापावच्या गाडीजवळील खुर्च्या तोडून वडापावसाठी लागणारे तेल व इतर साहीत्य फेकून देऊन नासधूस केली. त्यांनी केलेल्या दहशतीमुळे आजूबाजूला असलेल्या दुकानदारांनी दुकाने बंद करून घेतली. रस्त्यावरील लोक इकडेतिकडे सैरावैरा पळू लागले. त्यामुळे फिर्यादीच्या मदतीला कोणीही  आले नाही. तसेच आरोपींनी मोठमोठ्याने आरडाओरडा करून कोयते व लाकडी दांडके हवेत फिरवीत दहशत पसरवीत निघून गेले.

 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसArrestअटक