शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

उजनी धरणाने गाठला तळ; पुण्यासह नगर, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर ओढवणार पाणी संकट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 4:33 PM

उजनी धरणाच्या पाण्यावर पुणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील पन्नास हजार हेक्टरपेक्षा अधिक शेती अवलंबून आहे

ठळक मुद्देधरणातील पाणीसाठा दोन टक्क्यांवर तरी पाणी विसर्ग सुरूचइंदापूरकरांना करावी लागणार पाण्यासाठी पायपीट

इंदापूर :उजनी धरण उशाला अन कोरड घशाला ही बाब इंदापूरकरांना नवीन  नाही. परंतु, गेल्या वर्ष-सव्वा वर्षात राज्यात कोरोना महामारीचे संकट, शासनाचा लाॅकडाऊन व अतिवृृृष्टी व अवकाळी पावसाचे संकट यामुळे बळीराजा आधीच मेटाकुटीला आला आहे. पुणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांची जीवनदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या पाण्याने तळ गाठल्याने पुणे जिल्ह्यातील शेतकर्‍यांसमोर पाण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे.

उजनीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकर्‍यामध्ये चिंतेचे वातावरण आहे.तर कडक लाॅकडाऊनच्या काळात इंदापूरकरांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंतीची वेळ येवुन ठेपल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे.

सोमवारी (दि १०) सकाळी ६ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार उजनी धरणात २.७० टक्के इतकेच पाणी शिल्लक आहे. धरणाची पाणी पातळी ४९१.१३५ मीटर इतकी असून उपयुक्त पाणीसाठा १.४४ टीएमसी इतका शिल्लक आहे.तर उजनी धरणातुन सिना-माढा बोगदा २९६ क्युसेस, दहिगाव एलआयएस (फाटा) ८५ क्युसेस, उप कॅनल (फाटा) ६५० क्युसेस, व मुख्य कॅनलमधुन सोलापूरसाठी ३१५० क्युसेसने पाणी विसर्ग गेल्या अनेक दिवसापासुन सुरू आहे.तर सध्या उजनीतुन एकूण ४ हजार १८१ क्युसेसने पाणी विसर्ग सोलापूर भागासाठी सुरू असल्याने धरणाची पाणी पातळी एक ते दोन दिवसात खालावत जाण्याची शक्यता आहे. इंदापूर व पूणे जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या चिंतेत वाढ झाल्याचे दिसुन येत आहे.

उजनी धरणाच्या पाण्यावर पुणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील पन्नास हजार हेक्टरपेक्षा अधिक शेती अवलंबून आहे. सोलापूर व उजनीच्या पाण्यावर अवलंबुन असलेल्या भागासाठी धरणातून पाण्याचे आवर्तन पूर्ण करण्यात आले असल्याने सोलापूरला पाण्याची कमतरता भासण्याची शक्यता नाही. पण धरणातील पाण्याने तळ गाठल्याने आधीच आर्थिक संकटाने पूर्णपणे खचून गेलेल्या शेतकर्‍यांकडून उभ्या केलेल्या पिकांना जगविण्यासाठी प्रचंड धडपड सुरू असल्याचे दिसत आहे.मात्र, इंदापूर तालुक्यातील शेतकर्‍यांवर पुन्हा एकदा पाण्याचे संकट ओढवण्याची चिन्हे आहेत.——

टॅग्स :IndapurइंदापूरWaterपाणीDamधरणUjine Damउजनी धरणSolapurसोलापूरAhmednagarअहमदनगर