शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 7:55 PM

ममता यांनी आज मुर्शिदाबाद जिल्ह्यातील अल्पसंख्यकबहुल भागात एका पाठोपाठ एक सभांना संबोधित केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी पुन्हा एकदा समान नागरी संहितेचा (यूसीसी) मुद्दा उपस्थित केला आहे. ही भाजपची राजकीय खेळी असल्याचे सांगत ममता म्हणाल्या, यूसीसीचा हिंदूंना काहीही फायदा होणार नाही. एवढेच नाही तर, मतदानाच्या सुरुवातीच्या टप्प्यांत पराभवाच्या भीतीमुळे भाजपने विभाजनाच्या रणनीतीचा सहारा घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. ममता यांनी आज मुर्शिदाबाद जिल्ह्यातील अल्पसंख्यकबहुल भागात एका पाठोपाठ एक सभांना संबोधित केले.

ममता म्हणाल्या, “जेव्हा-जेव्हा निवडणुका होतात, तेव्हा-तेव्हा ते सांप्रदायिक तणाव निर्माण करण्यासाठी एखादा मुद्दा काढतात. आता ते UCC बद्दल बोलत आहेत आणि प्रचार करत आहेत की हे एका विशिष्ट समुदायाच्या विरोधात आहे. मात्र, हे UCC राजकीय विधानांशिवाय काही नाही आणि त्यात हिंदू नाहीत. देशभरात भाजपविरोधी भावना वाढत आहे, जे मतदानाच्या पहिल्या दोन टप्प्यांनंतर स्पष्ट झाले आहे."

‘भाजप भयभीत’ - "पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाचा पॅटर्न आणि टक्केवारी पाहता, भाजपचा पराभव झाल्याचे आपण आत्मविश्वासाने बोलू शकतो. उर्वरित पाच टप्प्यातही त्यांना पराभवाचाच सामना करावा लागणार आहे. भाजपमध्ये भीती आणि घबराट पसरली आहे," असे ममता म्हणाल्या.

यावेळी टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांनी बंगालमधील भाजप नेत्यांवर राज्यात जवळपास 26,000 शालेय नोकऱ्या रद्द करण्यात सहभागी असल्याचा आरोपही केला. त्या म्हणाल्या, “जर कुणी चूक केली असेल तर ती सुधारली जाऊ शकते. मात्र 26,000 नोकऱ्या हिरावणे योग्य नाही. ही भाजपची चाल आहे. ज्या भाजपने आपल्या नोकऱ्या हिरावल्या आहेत, त्या भाजपला मतदान करू नका.”

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Mamata Banerjeeममता बॅनर्जीCentral Governmentकेंद्र सरकारUniform Civil Codeसमान नागरी कायदा