शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 20:15 IST

'एकाच कुटुंबातील चार जणांनी वेगवेगळ्या काळात संविधानाचा अवमान केला आहे. जोपर्यंत मोदी जिवंत आहेत, तोपर्यंत धर्माच्या नावावर आरक्षण मिळणार नाही.'

Lok Sabha Election : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आतापर्यंत चार टप्प्यातील मतदान पार पडले असून, अजून तीन टप्पे बाकी आहेत. एकीकडे विरोधक विजयाचे दावे करत आहेत, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचाच विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. 'संपूर्ण जगाला विश्वास आहे की, भाजपचेच सरकार स्थापन होणार,' असा दावा पीएम मोदींनी केला.

देशात भाजपचे सरकार स्थापन होणारपंतप्रधान मोदींनी नुकतीच त्यांनी हिंदी वृत्तवाहिनी आजतकला मुलाखत दिली, ज्यात त्यांनी विरोधकांवर टीका करण्यासोबतच विविध मुद्द्यांवरही प्रकाश टाकला. यावेळी ते म्हणाले की, 'मी आणि माझे सहकारी कमळासाठी काम करतच आहोत, पण आमचे विरोधकही कमळासाठी काम करत आहेत. आम्ही निवडणूक जिंकणार आणि देशात भाजपचेच सरकार स्थापन होणार आहे. मला सप्टेंबर महिन्यातील बैठकीसाठी पुतिन यांचा फोन आलाय. G7 मध्ये सहभागी होण्यासाठी बोलावणे आले आहे. संपूर्ण जगाला विश्वास आहे की, भारतात भाजपचे  सरकार स्थापन होणार आहे, असे मोदी यावेळी म्हणाले. 

पहिल्या 125 दिवसांचा अजेंडा तयार...यावेळी मोदींना विचारण्यात आले की, 2024 मध्ये सत्तेत आल्यास पुढील 100 दिवसात काय करणार? कोणते मोठे आणि कठोर निर्णय घेतले जाऊ शकतात? यावर मोदी म्हणाले की, 'निवडणुका जाहीर होण्याच्या महिनाभर आधीच मी सर्व सचिवांची मोठी बैठक आयोजित केली होती. तेव्हा मी म्हणालो होतो की, आमचे 2047 चे व्हिजन आहे आणि त्यातील 5 वर्षांचा प्राधान्यक्रम सांगा. त्याआधारे 5 वर्षांचा रोडमॅप तयार करण्यात आला. मग मी त्यातून 100 दिवसांचा प्राधान्यक्रम निवडला. 100 दिवसांच्या अजेंड्यावर विचार करत असताना मला आणखी 25 दिवसांची गरज भासली. मी 100 दिवसांचे नियोजन केले आहे, पण मला यात आणखी 25 दिवस जोडायचे आहेत. हे 25 दिवस पूर्णपणे तरुणाईवर केंद्रित करायचे आहेत, असेही मोदी यावेळी म्हणाले. 

...तोपर्यंत धर्माच्या आधारावर आरक्षण मिळणार नाहीयावेळी मोदींनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विरोधकांवर निशाणा साधला. 'एकाच कुटुंबातील चार जणांनी वेगवेगळ्या काळात संविधानाचा अवमान केला आहे. संविधानाबाबत अशी घाणेरडी कृत्ये करण्याची त्या लोकांची वेळ आता निघून गेली आहे. म्हणूनच मी आज मनापासून सांगतोय की, जोपर्यंत मोदी जिवंत आहेत, तोपर्यंत धर्माच्या नावावर आरक्षण मिळणार नाही. तुम्ही धर्माच्या आधारे देशाची फाळणी केली, आता तुम्हाला धर्माच्या आधारे आरक्षण देऊन देशाची फाळणी करायची आहे. फक्त खुर्ची मिळवण्यासाठी तुम्ही हा खेळ खेळत आहात. देश हे मान्य करणार नाही. देशाला एकत्र करण्यासाठी प्राणाची आहूती द्यावी लागली तरी, मी देईन,' असा इशारा मोदींनी दिला.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस