शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 7:58 PM

Gujarat Lok Sabha Election 2024 Richest Candidate: देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे.

Gujarat Lok Sabha Election 2024: देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. पहिल्या दोन टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली असून तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी होणार आहे. गुजरातमधील सर्व २६ (सूरतमधील बिनविरोध जागा वगळता) जागांसाठी ७ तारखेला मतदान होणार आहे. २६६ उमेदवार लोकसभेच्या रिंगणात आहेत. भाजपच्या पूनमबेम माडम ह्या गुजरातमधील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत, त्यांची एकूण संपत्ती १४७ कोटी एवढी आहे. एडीआरने (असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस) ही माहिती दिली. 

तसेच मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीच्या उमेदवार रेखा चौधरी यांची केवळ २ हजार रूपये एवढी संपत्ती आहे. रेखा ह्या बारडोलीतून निवडणूक लढवत आहेत. ही जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. खरे तर गुजरातमधील एकूण २६६ उमेदवारांपैकी ६८ उमेदवार हे कोट्यधीश आहेत. अलीकडेच सूरतमधून बिनविरोध निवडणूक जिंकलेले भाजपचे मुकेश दलाल यांची संपत्ती १७ कोटी रुपये आहे.

श्रीमंत उमेदवार...सर्वात श्रीमंत उमेदवार पूनमबेम माडम ह्या जामनगरमधून निवडणूक लढवत आहेत. त्या येथून विद्यमान खासदार देखील असून भाजपने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी आपली संपत्ती ४२.७ कोटी रुपये असल्याचे जाहीर केले होते. त्यांच्याकडे ६० कोटी रुपयांची जंगम आणि ८७ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.  

दरम्यान, गुजरात लोकसभा निवडणुकीत भाजपचे एकूण २४ उमेदवार कोट्यवधी रूपयांचे मालक आहेत, तर काँग्रेसचे २१ उमेदवार करोडपती आहेत. तर बहुजन समाज पार्टीचे चार उमेदवारही करोडपती आहेत. भाजपच्या उमेदवारांची सरासरी मालमत्ता १५ कोटी रुपये, तर काँग्रेसच्या उमेदवारांची सरासरी मालमत्ता ६ कोटी रुपये आहे. १५ श्रीमंत उमेदवारांपैकी ८ भाजपचे आणि ७ काँग्रेसचे आहेत. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४GujaratगुजरातBJPभाजपाcongressकाँग्रेस